रेल्वे राज्यमंत्री व खासदार, रेल्वे प्रबंधकानी लक्ष देऊन ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मचे कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत असल्याने अपघाताची शकयता वाढली आहे. या बाबीकडे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि बोगस काम केल्याप्रकरणी कार्यवाही करावी अशी मागणी हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून रेल्वेचा प्रवास करणाऱ्या नागरीकातून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहमार्गावरील सर्वात मोठी जाग असलेले रेल्वेस्थानकामध्ये हिमायतनगर स्थानकांचे नाव अरवर्जून घेतले जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे क्वार्टरसह, रेल्वेचे कार्यालय आणी रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल, रेल्वे प्लॅटफॉर्मचे काम केल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. येथील रेल्वेस्थानकावर करण्यात येत असलेल्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. यातील बहुतांश रेल्वे विभागाची कामे ही निकृष्ट दर्जाची करून आपली पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबत अनेकदा जागरूक, नागरिक व पत्रकाराने सुचना देऊनही संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ठ काम केल्या जात असल्याने प्रवाशी नागरिकांतुन आश्चर्य व्यक्त केले आहे.
मागील वर्षांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवसस्थानाचे काम सुरु सून या कामात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून ठेकेदाराने शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे. आजघडीला क्वार्टरचे काम अर्धवट असून, दरवाजे लिंब, बाभूळ अश्या गहरीच्या लाकडाचे लावून इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले गेले आहे. या इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने चोरी करून वीज वापरल्याने ठेकेदारास १८ लाखाचा दंड महावितरणने ठोठावला आहे. त्यानंतरही ठेकेदाराने कामात कोणतीही सुधारणा न करता थातुर माथूर काम उरकून घेऊन देयके उचलण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
आज घडीला येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर क्रमांक दोनचे काम सुरु आहे. सदरचे काम दर्जेदार करण्याचे असताना ठेकेदाराने अंदाजपत्रकाच्या बगल देऊन प्लॅटफॉर्मच्या भरावाच्या कामात मुरमाड दगडाचा वापर थातुर माथूर सिमेंटीकरण करून निकृष्ट काम केले आहे. आयात प्लॅटफॉर्मच्या बेड्चे काम सुरु करण्यात येणार असून, यासाठी प्लॅटफॉर्म कॉर्नरला वापरण्यात येणाऱ्या गट्टूचे काम थातुर माथूर व कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करून केले जात आहे. एवढेच नैतर प्लॅटफॉर्मचे काम करताना येथे वर्क इन प्रोग्रेसचे कोणतेही फलक लावले असून, प्लॅटमॉर्फमवर गट्टू तयार केले जात आहेत. खरे पाहता प्लॅटफॉर्मची जागा रिकामी सोडून दुसरीकडे काम करण्याचे असताना प्लॅटफॉर्मवर सिमेंटचे गट्टू तयार करण्यात येत आहेत.
या प्रकारामुळे रेल्वे क्रॉसिंग होताच प्रवाश्याना रेल्वेतून चड-उतर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागतो आहे. अश्या या बेपर्वाही वृत्ती आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संभाव्य धोक्याची शक्यता वाढली आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मच्या निकृष्ट कामाकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, रेल्वे प्रबंधक नांदेड यांच्यासह राजकीय मंडळीनी लक्ष देऊन प्लॅट फॉर्मच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करावा. प्लॅटफॉर्मचे काम दर्जेदार करून घेण्यासाठी भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र कोणीही याकडे लक्ष देत नसल्याने संबंधित कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी हे निकृष्ट काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. हिमायतनगर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या कामाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी आणि शासनाच्या निधीचा होत असलेला गैरवापर थांबवून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
हिमायतनगर येथील रेल्वेस्थान कावरील प्लॅटफॉर्मचे कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत असल्याने अल्पवधीतच हि कामे उखडून जाऊन अपघाताची शकयता वाढली आहे. त्यामुळे शासनाच्या अंदाज पत्रकास बगल देऊन होत असलेल्या कामाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी याकडे लक्ष देऊन कामाचा दर्जा सुधारण्यासाठी संबंधित यंत्रणेला ताकीद द्यावी, अशी मागणी विकासप्रेमी नागरिकांनी केली आहे.