नांदेड| येथील अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्कृष्ट साहित्यकृती साठी देण्यात येणारे अक्षरोदय साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये यशपुष्प या साहित्यकृतीसाठी अक्षरोदय साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. असे अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष मा. मारोती मुंडे यांच्याकडून पत्राद्वारे माहिती मिळाली आहे.
हा कार्यक्रम येत्या २७ मार्च रोजी पीपल्स कॉलेज परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र या सभागृहात सकाळी ठीक ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंगलताई फुलारी उद्घाटक ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे व मंडळाचे राज्याध्यक्ष मा. मारोती मुंडे हे राहणार असून यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.