नविन नांदेड| विष्णुपुरी येथील काळेशवर मंदिर पाठीमागील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बडुन दि.१८ मार्च धुळवडीच्या दिनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१८ मार्च रोजी दुपारी तिनं ते चार सुमारास होळी खेळुन नांदेड येथील विजय नगर भागातील जय रुपेश पुजारी वय १९ व त्यांच्या मित्र गजानन राजु हाटकर वय २८ रा.दतनगर नांदेड हे दोघे काळेशवर मंदिर विष्णुपुरी पाठीमागे गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी ऊतरले असता त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्यात बडुन मरण पावले. अशी माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मिळताच तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तात्काळ अंमलदार गवळे एम.बी.यांना आदेशित करून घटनास्थळी पाठविले व त्यांनी पाहणी केली व जिवरक्षक दलाच्या पथकावला बोलवले.
तात्काळ जिवरक्षक दलाच्या साह्याने जिवरक्षक सयद नुर पेहलवान यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद मुश्ताक,कालीदास खिल्लारे, सय्यद,शेख,अजिज शेख गफार यांनी त नदीपात्रात शोघ घेतल्यानंतर दोघांचे प्रेत हाती लागले. प्रेत नदी पात्राचा बाहेर काढून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत पाठविण्यात आले. या प्रकरणी विजय रुपेश पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद १९ मार्च रोजी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रामदिनेवार हे अधिक तपास करत आहेत.