नविन नांदेड| हडको भागातील अण्णा भाऊ साठे सभागृह जवळ पार्किंग साठी उभी केलेली चार चाकी गाडी अज्ञात आरोपींनी १८ मार्च रोजीच्या मध्यरात्री ४ वाजेच्या सुमारास गाडीला पेटवून दिल्यामुळे गाडी पुर्ण जळुन खाक झाली. बाजुस उभा असलेला तिनचाकी अटोचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडको परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह समोर पार्किंग साठी उभी केलेली गाडी नं. एम.एच.१४ बि.सी.३८ ४९ ही उभी केली असता १८ मार्च चार मध्यरात्री रात्री १२ ते २ चा सुमारास अज्ञातानी पेटवून दिले यात कार जळुन गेली आहे ,त्या ठिकाणी तिनं चाकी अटो एम.एच.२६ एन ४८२० हा ही जळाला आहे, आग एवढी मोठी होती कि, सभागृह चा भिंती वर आगीचे धुर लोटल्या गेले,घटनेची माहिती परिसरातील नागरीकांनी हातपंपाचा पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला..
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माहिती दिली माहिती कळताच दोन अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहायाने आग विझविण्यात आली,या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. धम्मदीप सांवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम ४३५,४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस अंमलदार शेख जावेद हे करीत आहेत.