आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
काँग्रेस पक्षाच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा बैठक पक्ष निरीक्षक मा.आ.नामदेवराव पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मा.आ.हणमंतराव पा. बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मा.आ.अविनाशराव घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड , काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापुरकर, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, युवक काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष बोन्लेवाड, जेष्ठ नेते माधवराव पा.उंद्रीकर, उपाध्यक्ष उत्तम अण्णा चौधरी, मा.नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड,बालाजी नाईक कलंबरकर, शंकर पाटील जांभळीकर सरपंच , संदिप पा.ईटग्याळकर, महासचिव आकाश पा.वडजे,संजय पा. बोमनाळीकर, उपसरपंच शरद पा. अंबुलगेकर, उपसरपंच सुरेश पा. बेळीकर,जयप्रकाश कानगुले,सरपंच गणेश शिंदे,हेमंत घाटे,सुनील पा. आरगिळे, महासचिव गुरुनाथ उमाटे, रामेश्वर इंगोले, उपाध्यक्ष विशाल गायकवाड,चेअरमन रुपेश लिंगापुरकर,मारोती मटके, सरपंच संदिप घाटे,सदाम शेख सलगरकर, यांच्या सह तालुक्यातील असंख्य कॉंग्रेस पदाधिकारी व मुख्य नोंदणीकर्ता कार्यकर्ते उपस्थित होते.
या आढावा बैठकीत सेवा सो सदस्य अश्विन अभय पाटील राजुरकर,ठाण्याचे निखिल पा जाधव, शिवाजी पा.मैलापुरे, आकाश जाधव यांचा कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. आढावा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक मा नामदेवराव पवार , अविनाश घाटे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय भाषणात बोलतांना मा.आ. बेटमोगरेकर यांनी डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात मुखेड तालुका नांदेड जिल्ह्यात अग्रेसर राहुन ना.अशोकरावजी चव्हाणांचे हात व कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी युवकांनी मेहनत घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन आपल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे अशी सूचना केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापूरकर यांनी मांडले तर यु.काँ.अध्यक्ष संतोष बोन्लेवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.