या नोटीस विरोधात आ.डॉ.तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसील कार्यालया समोर महाविकास आघाडी सरकारच्या नाकामी कृत्याविरोधात निषेध करून तथाकथित विषयात पोलिसांनी दिलेली नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला.
यावेळी मुखेड / कंधार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ.डॉ तुषार राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.वीरभद्र हिमगिरे, लक्ष्मण पा.खैरकेकर,व्यंकटराव लोहबंदे ,अशोक गजलवाड, नागोराव पाटील,आनंदा पाटिल जुन्ने,शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, नगरसेवक राजू बामणे, शिवा मुद्देवाड, राजू घोडके, हणमंत नरोटे,विनोद दंडलवाड , मुजिफ सौदागर, खाजा धुंदी, अमरसिंह ठाकूर,संगमेश्वर देवक्तते, संभाजी आटलकर, शिवकुमार बंडे,करण रोडगे ,मोहन जाधव ,शिवराज पाटील, महेबूब वडगावकर , गजानन साखरे, मिलिंद लोहबंदे यांच्या सह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.