किनवट, माधव सुर्यवंशी| बोधडिचे भुमिपुत्र व डॉ मारोती कराड यांचे चिरंजिव रोहित हे वैद्यकीय शिक्षणा करिता युक्रेन या देशात गेले होते. रशिया व युक्रेन या देशादरम्यान सुरु झालेल्या युध्दामुळे सुमारे २० हजार विद्यार्थी युक्रेन येथे अडकले होते.
यात रोहित कराड देखिल अडखले होते हि बातमी कळतात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे ता. अध्यक्ष गजानन मुंडे पाटिल यांना कराड कुटुंबियांच्या संपर्कात राहुन त्यांना योग्यप्रकारे धीर देण्याच्या सुचना दिल्या होत्या.
पहिल्या दिवसापासुन गजानन मुंडे हे कराड कुटुंबियांच्या संपर्कात होते. तर दिनांक ०५ मार्च रोजी रोहित कराड यांचे हैद्राबाद मार्गे बोधडी येथे आगमन झाले त्या नंतर गजानन मुंडे पाटील यांनी आज दिनांक ६ मार्च रोजी रोहित कराड यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे सपत्नीक स्वागत केले. यावेळी श्री व सौ मुंडे यांच्यासह महेश मुंडे पाटील देखिल उपस्थित होते.