हिमायतनगर - भोकर मार्गावरील सरसम नजीक कार दुचाकीची जबर धडक २ जण जागीच ठार -NNL

दोन गंभीर जखमींवर सरसम प्राथमिक रुग्णालयात उपचार करून नांदेडला हलविले 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर रहदारी वादळी असून, त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. अश्याच भरधाव वेगात भोकर कडून हिमायतनगरकडे येणाऱ्या एका निळ्या रंगाच्या कारणे दुचाकीला जबर धडक देऊन उडविल्याने दोघेजण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य २ जण जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. हि घटना सरसम बु.जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ४ वाजता घडली, गंभीर जखमींना उपचारासाठी सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार करून मौजे वाळकेवाडी येथील युवक आपली दुचाकी क्रमांक एम एच २६ ए एच - ८४६१ वरून भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे जात होते. दरम्यान दुचाकी सरसम नजीक असलेल्या महादेव मंदिरजवळ येताच भोकरकडून - हिमायतनगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या ह्युंडाई कार क्रमांक एम एच ४४ - जी १८८२ ने दुचाकीला जबर धडक दिली. 

या धडकेत दुचाकी उडून दूरवर पडल्याने दुचाकीवरील युवक केरोजी वामन हुरदुके वय २४ वर्ष आणि गंगाधर परसराम माजळकर वय ३० वर्ष हे दोघे जागीच ठार झाले आहेत.  तर गणपत प्रल्हाद वागतकर आणि दिगंबर प्रल्हाद वागतकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथून नजीक असलेल्या सरसम बु.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले आहे.


दोन्ही वाहनाची जबर धडक झाल्याने चाचाकी गाडी चालकांच्या बाजूने पूर्णतः  चपटून गेली आहे. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, कारचालक पसार झाला असल्याचे संगितले जात आहे. घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांना देण्यात आली असून,  पोलीस घटनास्थळावर पोचून पंचनामा करत आहेत. वृत्त लिहीपर्यंत या संदर्भात कोणतीही नोंद पोलीस डायरीला झाली नव्हती.

हिमायतनगर - भोकर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून वाहनांची मोठी वर्दळ झाली आहे, रस्त्याच्या मधून डिव्हायडर नसल्याने रस्ता झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक अपघात झाले असून, यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. भविष्यात असे अपघात होणार नाहीत यासाठी राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा आणि विदर्भाच्या धर्तीवर धानोडा - भोकर - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर, सूचना फलक, ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर आणि वाहनाचा वेग मर्यादित करण्यात येणे गरजेचे असल्याचे मत घटनास्थळावर उपस्थित झालेल्या अनेकांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी