नांदेड| गोशाळा महासंघ महाराष्ट्र व्दारा आयोजित मराठवाडा स्तरीय गोशाळा ट्रस्टी संमेलन रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, कलेक्टर बंगल्या मागे नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत संपन्न होणार आहे. या संमेलनात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 100 गोशालांचे 300 ट्रस्टी उपस्थित राहणार आहे.
या संमेलनाचे उदघाटक – मा. उपेन्द्रजी कुलकर्णी (क्षेत्र सेवाप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) संमेलनाचे अध्यक्ष- मा.महेंद्रभाई संगोई (अध्यक्ष, गोशाळा महासंघ महाराष्ट्र) विशेष अतिथी – परम पूज्य श्री बलविंदरसिंहजी महाराज (लंगर साहेब नांदेड) हे राहणार आहे.
या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा. गिरीशभाई शहा (समस्त महाजन, मुंबई) एड. मोतीसिंह मोहता (विदर्भ अध्यक्ष गोशाळा महासंघ) मा. सुनीलजी मानसिंहका (सदस्य, कामधेनु आयोग भारत सरकार) मा. सुधीरजी विध्वंस (देवगिरी प्रांत प्रशिक्षण प्रमुख) मा. रतनभाई लुनावत (श्रीमद राजचंद्र जीवदया मिशन, धरमपूर)
प्रमुख अतिथी मा. जयशभाई शहा (श्री. आदिजीन युवक चेरिटेबल ट्रस्ट) मा. विजयभाई वोरा (मुंबई) मा. भाऊराव कुदळे (क्षेत्र गोरक्षाप्रमुख. विहिप पुणे) मा. ह. भ. प. संदीप महाराज शर्मा, परभणी हे राहणार आहे.
या संमेलनात मराठवाडयातील सर्व नोंदणीकृत गोरक्षण संस्था व गोशालांचे संघटन निर्माण करणे, या विषयावर चर्चा होणार तसेच गोशाळा आत्मनिर्भर व स्वावलंबी कश्या बनवाव्या या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार. गोरक्षा करिता केन्द्र सरकार व राज्य सरकारचे विविध कायद्याची अंमलबजावणी कशी करावी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
गोशालांचे आदर्श व्यवस्थापन व प्रबंधन कसे करावे तसेच गोशालांमध्ये शासकीय नियमानुसार कोणकोणते कागदपत्र, रजिस्टर, फाईल, आवश्यक आहे तसेच कोणते कागदपत्र गोशाळा ट्रस्टी यांनी ठेवावे या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गोशाळा संबंधित अन्य विषयावर या संमेलनात चर्चा होणार आहे.
मराठवाडयातील सर्व गोशाळा ट्रस्टी व संचालकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला खालील आयोजक उपस्थित होते. डॉ. सुनील सूर्यवंशी, श्री. गिरीश जोशी, श्री. किरण बिच्चेवार गोरक्षा विभाग प्रमुख नांदेड विभाग, विश्व हिंदु परिषद, श्री. सनतजी महाजन, श्री. प्रल्हाद घोराबांड, श्री. अच्चुत महाजन उपस्थित होते.