लोहा| तालुक्यातील आंबेसांगवी येथील भूमिपुत्र पण लोह्यातील शिवकल्याण नगरात राहणारे शिक्षक अशोकराव सावंत यांचे चिरंजीव डॉ.आकाश सांवत एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी एमडीसाठी प्रवेश निश्चित केला. तर कन्या आकांक्षा हीने बीएएमएससाठी प्रवेश घेतला आहे.
जुन्या लोह्यातील एस टी महामंडळातील वाहक कै सोपान भाऊराव पवार यांची कन्या सविता अशोक सावंत यांचा मुलगा एमबीबीएस झाला पदव्युत्तर शिक्षणासाठी नागपूर येथे स्त्री रोग व प्रसूती या विषयात ते एम डी करणार आहे.
त्यांची बहीण आकांक्षा अशोकराव सांवत हिने बिएएम एस साठी प्रवेश घेतला आहे.सावंत गुरुजींचे मुलगा डॉक्टर झाला आता मुलगी डॉक्टर होत आहे. त्या यशाबद्दल कर निरीक्षक माधव पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही बहीण भावाचा सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार, व पांडुरंग पवार यांचे ते भाचे आहेत .