नविन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील २७ परिक्षा केंद्रावर लातुर बोर्डचा दहावी शालांत परिक्षांना दि.१५ मार्च पासून सुरूवात झाली असून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दहावी परिक्षांना दि.१५ मार्च पासून सुरूवात झाली असून या मध्ये राष्ट्रमाता उर्दू मराठी माध्यमिक विद्यालय वाजेगाव, संजय गांधी हायस्कुल पुणेगाव, | गोदावरी विद्यालय पिपळगामजी कै.माधवराव वटेमोड विद्यालय जुनाकौठा, इंदीरा गांधी हायस्कुल ज्युनियर कॉलेज सिडको, श्री शिवाजीराव पाटील हायस्कुल वाजेगाव, श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक विद्यालय असर्जन कैप, वसंत हायस्कुल व उच्च माध्यामिक विद्यालय मुसलमानवाडी पाटी, नालंदा इंग्लिश स्कुल सिडको , नरहर कुरुंदकर हायस्कुल कौठा, सावित्रीबाई फुले हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय वाजेगाव,
इस्लाइल अमल माध्यमिक शाळा सिडको नांदेड अलमाइकबाल उर्दु हायस्कुल सिडको नांदेड, महात्मागांधी हायस्कुल सिडको नांदेड, महात्मा फुले माध्यमिक आश्रम शाळा वाघाळा, शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी, गाडगेबाबा हायस्कुल पांगरी मधुबन महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव, कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्ययस्कुल बळीरामपुर ,हजरत फातेमा मुलींची माध्यमिक शाळा खिदवई नगर नांदेड, जि.प.हायस्कुल विष्णुपुरी नांदेड, इंदीरा इंटरनॅशनल पब्लिक स्कुल सहयोग कैंपस विष्णुपुरी नांदेड,इंदीरा स्कुल सहयोगकैंपस विष्णुपुरी ,नांदेड येथे सुरूवात झाली असून परिक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार व होमगार्ड यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून गोपनिय शाखेचे उपनिरीक्षक बि.टी.केद्रे व अंमलदार बि.एम.दंतपलले,तानाजी चाटे, बालाजी चौधरी हे परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.