धनेगाव अंदनान नगर परिसरातील घरधारकांना नळकनेकशनचा शुंभारभ -NNL


नविन नांदेड|
नांदेड जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना अंतर्गत धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने अंदनान नगर भागातील ४०० नागरीकांना घरगुती नळकनेकशनचा शुंभारभ जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य भुंजगराव भालके व ग्रामपंचायत संरपच गंगाधर पाटील शिंदे, सदस्य, ग्रामस्थ यांच्या ऊपसिथीत दि.१५ मार्च रोजी करण्यात आला.

नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हंबर्डे , जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे संरपच गंगाधर पाटील शिंदे, ऊपसंरपच डॉ.पुजा शिंदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्हा परिषद चा वतीने पाणी पुरवठा योजना अंतर्गत धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत एकुण १५ हजार ग्रामस्थ यांना घरगुती नळकनेकशन देण्यात येत असुन अंदनान नगर भागातील ऊबेदा,सानिया,आयन गार्डन या परिसरातील एक हजार ग्रामस्थ यांना घरगुती नळकनेकशन देण्यात येत असुन ४०० जणांना नळकनेकशन देण्यात आले असून यांच्या शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,जेष्ठ सदस्य भुंजग पाटील, ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे,गफुर साब, शिवाजी बुचडे,रफिक भाई, मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरीक मनोधदीन चांदसाब इनामदार, सय्यद अहमद सय्यद पाशा,शितल मुनीर ,सय्यद मुखपत्र,नफीस भाई,सय्यद मुनीर,सय्यद जावीद, मंजूर भाई, सय्यद कासीम, शेख खाजा यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने मुलभूत सुविधा ग्रामस्थांना देण्यात येत असुन जिलहायात सर्वात जास्त नळकनेकशन देणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे सांगितले जाते. नळकनेकशन गुत्तेदार श्रिनीवास किरकन यांच्या सह संबंधित कर्मचारी हे दैनंदिन ग्रामस्थांना नळकनेकशन देत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी