लोहा| बदले को बदला अशी डायलॉग हिंदी चित्रपटात ऐकतो पण जेव्हा दोन शासकीय कार्यालये एकमेकांवर वसूलीसाठी कुरघोडी करीत असतील तर असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. बिल थकल्यामुळे लाईट तोडण्यात आली नंतर पालिकेने जशास तसे उत्तर देत वीज ऑफिसच्या
पालिकेने सील ठोकले. ही कार्यवाही सांयकाळी झाली पालिका प्रशासनाच्या कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी, विद्युत विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे कळविण्यात आली तर या बाबत विद्युत मंडळाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात बराच वेळ चर्चा झाली व तोडगा निघाला नाही .
लोहा नगर पालिकेचा कारभार सतत या न त्या कारणास्तव तर वीज मंडळाचा कारभार म्हणजे बिल भरा नाही तर लाईट बंद असाच सुरु असतो. आता हे दोन्ही ऑफिस आपापले थकीत बिल व मालमत्ता कर वसुलीसाठी एकमेकांच्या समोर जशास तसे उभे राहिले आहेत. वीज मंडळाचे पाणी पुरवठा व दिवा बत्ती चे ६कोटी १०लक्ष रुपयांच्या वीज बिल पालिकेकडे थकीत आहे ते भरणा करावा यासाठी लाईट ऑफिसने शहरातील दिवाबत्तीची वीज तोडली. सुनेगाव येथील पाणीपुरवठा तेवढा आज पर्यंत सुरू होता. नगर पालिकेने ७८ लक्ष रुपये मालमता करा पोटी विद्युत ऑफिसकडे थकीत आहेत. त्यांनी बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास सब डिव्हिजन कार्यालय व लोहा शहर कार्यालयास सील ठोकले त्यामुळे "जशास तसे " कार्यवाहीमुळे लाईट ऑफिस चक्रावून गेले .
उपकार्यकरी अभियंता सचिन दवंडे सहायक अभियंता शिवाजी वाघमारे, कार्तिक जाधव (अकाऊंटंट) डिव्हिजन अकाऊंटट नांदेड ग्रामीणचे सुरेश घुगे तहसीलदार व्यकटेश मुंडे यांच्या दालनात पोहचले त्यांनी मुख्याधिकारी ऍड गंगाधर पेंटे याना सांगून वीज बिल भरणा करावयास लावावे व लाईट ऑफिसचे सील काढावे असे तहसीलदार यांना विनंती केली. तहसीलदार यांनी दोन्ही कार्यालय प्रमुखास एकमेकांना सहकार्य करण्याचे सांगितले.
मुख्याधिकारी यांच्या दालनात उपकार्यकरी अभियंता दवंडे, सहायकशहर अभियंता शिवाजी वाघमारे तसेच मुख्याधिकारी ऍड पेंटे यांची बराच वेळ चर्चा झाली. पण तोडगा निघाला नाही वीज बिला वरून पालिका व वीज मंडळ यांच्यात गेल्या अनेक वर्षा पासून वाद आहे. शहरातील कूपनलिका ( बोअरवेल) संख्येत घट झाली तरी वीज बिल अधिक संख्येचे दिले जाते आहे. अन्य तक्रारी पालिका प्रशासनाच्या आहेत तर विद्युत मंडळाचाही प्रश्न प्रलंबित आहे. हा वाद मागच्या पानावरुन पुढे सुरू आहे .लोहा नगर पालिका व वीज वितरण कंपनी अर्थात लाईट ऑफिस यांच्यातील बिल वसुली साठी जशास तसे कार्यवाही मोहीम सुरूझाली आहे
तुमच्या कडचे द्या - आम्ही भरू-ऍड पेंटे - नगर पालिकेने मालमता कर वसुलीसाठी विद्युत मंडळाच्या ऑफिसला सील ठोकले मुख्याधिकारी यांच्या दालनात विद्युत मंडळाचे उपकार्यकरी अधिकारी सचिन दवंडे, सहायक अभियंता शिवाजी वाघमारे व मुख्याधिकारी ऍड गंगाधर पेंटे यांच्या बराच वेळ चर्चा झाली. तुमच्या कडील थकीत रक्कम द्या आम्ही ती भरू असे मुख्याधिकारी पेंटे यांनी सांगितले तर प्रलंबित बिलामुळे दोन्ही ऑफिस मध्ये बिलाचा प्रलंबित प्रश्न आहे.