महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा- NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख वक्त्या डॉ. दिपाली रँपनवाड , व्यासपीठावर प्रा.डॉ. ए.एन.गित्ते , प्रा.सौ.एन.टी.चवळे , प्रा.कु.पुनम बोमनवाड , उषा वारकड , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी हे उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय वारकड , आभार प्रदर्शन प्रा.पुनम बोमनवाड  , प्रास्ताविक प्रा.डॉ. ए.एन.गित्ते यांनी केले . मनोगतात प्रा.कु.पुनम बोमनवाड , प्रा.सौ.एन.टी.चवळे , श्रीमती उषा वाडकर यांनी स्त्री स्वातंत्र्य , चळवळ या विषयावर भावना व्यक्त केले . 

प्रमुख वक्त्या डॉ. दिपाली रँपनवाड यांनी आपल्या भाषणात महिला ही घराची कणा आहे . आई , मुलगी ,मैत्रीण , पत्नीच्या त्यागातूनच समाजाचा विकास होतो . महिला ह्या पूर्वीपासून सबला होत्या , प्राचीन काळापासून स्त्री , पुरुषांमध्ये एकमेकांना पुरक असे गुण आहेत . स्त्रीला नवनिर्माण करण्याची ताकत आहे . झाशीची राणी , जिजाऊ माता यासारख्या स्त्रिया सक्षमपणे देश चालविण्यासाठी कार्य केले .

 स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर काळात मोठ मोठ्या पदावर महिला योगदान दिले . केवळ कपडे परिधान करून पुरोगामी होऊ शकत नाही तर विचारांची शिदोरी खुप महत्त्वाचे आहे असे विचार व्यक्त केले . अध्यक्षीय समारोपाच्या प्रसंगी डॉ. एस.बी.अडकिणे यांनी सर्वांना महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिले . सामाजिक , राजकीय , वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीबरोबरच सर्व क्षेत्रातील महिलांचे  योगदान महत्त्वाचे आहे. 

महिलांमुळेच आपणास कर्तृत्व सिध्द करण्याची शक्ति मिळते . इतिहासातील थोर महिला उत्कृष्टपणे कार्य केले . स्त्री , पुरुष दोघांचे समन्वय खुप महत्त्वाचे आहे . परिवारातील महिलांचे बळ पुरुषांसोबत असते म्हणूनच समाजात पुरुष वावरत असतात . सर्वच क्षेत्रात सरसपणे महिला कार्य करीत आहेत . त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे . स्त्री - पुरुष दोघांनी अतिरेक करु नये असे समारोप केले . बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी