नांदेड,आनंदा बोकारे। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक गटातील अशा एकूण 70 जणांनी आज माननीय अधिष्ठाता डॉ. पी ..टी जमदाडे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या प्रलंबित मागण्या करिता त्यांना घेराव घातला .
आज महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय महाविद्यालयतील महिला अध्यापकांनी मा. अधिष्ठाता यांना त्यांच्या प्रलंबित मागण्या करिता जाब विचारला व शासनस्तरावर या मागण्या लवकरात लवकर कशा मान्य होतील यासाठी प्रयत्न करावा अशी गळ घातली. यावर अधिष्ठाता जमदाडे यांनी बोलताना सांगितले की तुमच्या मागण्यांचा विचार चालू असून त्या मागण्या रास्त आहेत व त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल परंतु आपण संप मागे घ्यावा असे त्यांनी सूचित केले .
आजच्या ह्या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. सुधा करडखेडकर डॉ. मुळे मॅडम, डॉ. सुपर्णा सुवर्णकार ,डॉ एमेकर, डॉ. संजीवनी मोरे , डॉ. विमल राठोड इत्यादींनी केले सदरील अध्यापकांच्या मागण्या या सातव्या सातव्या वेतन आयोगातील विविध भत्ते यांना पूर्वलक्षी प्रभावाने प्रमाणे लागू करावे तसेच आश्वासित प्रगती योजना चा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करावा त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी अनेक वर्षापासून अस्थायी स्वरूपात कार्यरत असणारे साहाय्यक प्राध्यापक यांचे शासन सेवेत समावेशन करावे अशा आणि विविध मागण्यांकरिता हे आंदोलन चालू आहे.
आजच्या आंदोलनात डॉ.हेमंत गोडबोले ,डॉ.विशाल मुधोळकर, डॉक्टर कपिल मोरे ,डॉ. उबैद ,डॉ .गाडेकर रामराव,डॉ. मुकुंद कुलकर्णी ,डॉ.संजय मोरे, डॉ.पंकज कदम ,डॉ. मुंगल इत्यादींनी सहभाग नोंदवला.