जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर-NNL

आक्षेप, हरकती, सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे आवाहन

नांदेड,अनिल मादसवार। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात मे 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहिर करण्यात आला आहे.

 या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात गुरुवार 10 मार्च ते मंगळवार 17 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आालेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे  (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी