नांदेड। येथील वजीराबाद स्थित शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथील अध्यापक संघटनेने वैद्यकीय अध्यापकांच्या चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पत्र आज त्यांनी वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय मोरे व सचिव डॉ. मुकुंद कुलकर्णी यांना सुपूर्द केले .
सध्या वैद्यकीय शिक्षक संघटनेचा त्यांच्या प्रलंबित मागण्या करिता असलेला संप व त्या अनुषंगाने त्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांच्याही मागण्या सारखेच असल्याने त्यांनी वैद्यकीय अध्यापकांच्या या आंदोलनास आपला पाठिंबा दिला असून यापुढील सर्व आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. पाठिंब्याचे पत्र देताना आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. मंगेश नळकांडे ,डॉ.भास्कर पेरके, डॉ.संजय राठोड हे उपस्थित होते
दिनांक 14 मार्च 2022 पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात म्हणजेच रुग्णसेवा बंद करण्यास आयुर्वेद अध्यापकांनी पाठिंबा दर्शवला असून तेही यात सामील होतील असे त्यांनी आश्वासन दिले व शासनाकडून या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न व्हावेत असे त्यांना वाटते. हे पत्र देताना वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. हेमंत गोडबोले डॉ.जे बी देशमुख , श्रीचक्रधर मुंगल उपस्थित होते.