वादग्रस्त तात्पुरते मुतवल्ली ची इनामी सातबाऱ्यावरून हकालपट्टी -NNL

बिलोली उपविभागीय अधिकारी यांनी सातबारा कोरा करण्याचे दिले आदेश


बिलोली।
शहरातील नरसी-बोधन या राज्य महामार्गावरील रोडच्या  दोन्ही बाजूला असलेल्या मुस्लिम देवस्थानच्या स.क्रं:-५७७ व ५८० या ईनामी खिदमत माश जमिनीच्या सातबारा उता-यावर वक्फ संस्था मस्जिद ए कला टोंब नवाबसरफराज खान शहिद मकबरा झुजागन नकारखाना व कब्रस्थान या नावाची नोंद मालकी रकान्यात घ्यावी तर ईतर अधिकारात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेली वादग्रस्त तात्पुरते मुतवल्लीसह सर्व खाजगी नावे तत्काळ  काढुन प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्याचे आदेश बिलोली येथील उपविभागिय अधिकारी सचिन गिरी यांनी दि.४ मार्च २०२२ रोजी दिले आहे.


शहरात ईनामी खिदमत माश जमिन स.क्रं.५७७ क्षेञ २६ एकर ३० गुंठे स.क्रं.५८० क्षेञ १ एकर ३५ गुंठे या दोन सातबारावर मिळून अशी एकुण २८ एकर २५ गुंठे जमिन आहे. सदरिल सातबारावर येथील वादग्रस्त तात्पुरते मुतवल्लीसह त्यांचे नातेवाईक,खाजगी ईसमांनी अनाधिकृतपणे व बेकायदेशिर रित्या सातबारावरील मालकी रकान्यात असलेले सदरिल वक्फ संस्थेचे नाव फेरफारच्या आधारे नाव कट केले होते तर ईतर अधिकारात आपाली व नातेवाईकाची  नावे लावून घेतली होती.

या गंभिर प्रकरणात वादग्रस्त तात्पुरते मुतवल्लीसह ईतर सर्व खाजगी नावे लवकरात लवकर काढुन टाकण्यात यावे यासंबंधी मोहसीन खान,मो.रफिक अब्दुल शकुर,आजमबेग महेमुद बेग,सिध्दार्थ तलवारे,साजीद कुरेशी गफूर कुरेशी,शेख बुशरा निजाम,शेख आसरा अफजल यांनी बिलोलीच्या उपविभागिय अधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती.


या विषयी जवळपास पाच महिन्यात अनेक सुनावण्या घेण्यात आले.अपिलार्थी व उत्तरार्थी या दोघांचे तोंडी व लेखी म्हणणे ऐकुन उपविभागिय अधिकारी यांनी दि.४ मार्च रोजी शेवटची सुनावणी घेत आदेश पारित केला.सदरिल आदेशामध्ये वक्फ अधिनियम १९९५ मधिल कलम ५१,२१ (ए-१) ५१,५२व ५२-ए व महाराष्ट्र जमिन महसूल संहिता१९६६ नुसार बिलोली येथील सर्वे क्रंमांक :-५७७,५८० च्या सातबा-यावरील मालकी वा ईतर अधिकार वा रकान्यातील वादग्रस्त मुतवल्लीसह ईतर सर्व खाजगी ईसमांची नावे तात्काळ कमी करुन मालकी रकान्यात व ईतर अधिकारात घेण्यात आलेल्या सर्व फेरफार नोंदी रद्द करुन मालकी रकान्यात फक्त वक्फ संस्था मस्जिद ए संस्था कला टोंब नवाब सरफराज खान शहिद मकबरा झुजागन नकारखाना कब्रस्थान या नावाची नोंद घेण्यात यावी.ईतर कोणतेही नाव व सातबाराचे मालकी हक्क व ईतर अधिकारात ठेवू नये असे आदेशच उपविभागिय अधिकारी यांनी दिले आहे.तसेच या वक्फ संस्थेच्या जागेवर लवकरात लवकर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

वक्फ बोर्डाची मालकी असलेल्या ईनामी खिदमत माश जमीनी च्या सातबाऱ्यावर वादग्रस्त तात्पुरते मुतवल्ली सह एक नव्हे दोन नव्हे तब्बल 29 खाजगी लोकांची नावे आलीच कशी? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे.आणि ह्यांच्या वर वक्फ बोर्ड कायदा 1995 च्या कलमा अंतर्गत शर्तभंग ची कारवाई होण्याची शक्यता असून तर दुसरी कडे तहसील कार्यालयातील या प्रकरणाशी संंबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी