गुन्हेगारीच्या क्षेत्रांत व अवैध धंद्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव -NNL


हदगाव,शे चांदपाशा|
शहर व परिसरात गुन्हेगारीच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात युवकांचा शिरकाव होत आहे. वाढती बेरोजगारी याला कारणीभूत ठरत आहे. परिणाम स्वरुप चोरी दरोडे खुन फुस लावुन  पळविणे यासारख्या घटना आता नेहमीच्याच झाल्या असल्याचे दिसुन येत आहे.

गावगुडानी तालुक्यात साम्राज्य प्रस्थापित केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. वरिष्ठ पोलिस आधिकारी स्थानिक पोलीस व जनतेच समन्वय नसल्याने केव्हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मागील दोन वर्षाच अवलोकन केल्यास शहरात व परिसरात सातत्याने गुन्हे व हाणामारीच्या घटना घडत आहेत. अवैध धद्यातुन मोठी रक्कम मिळत असल्याने काही गावगुंड आता पावरफुल बनले आहे.

या समाजकंटकांनी सर्वसामान्य लोकांचे जगणे कठिण करुन टाकले आहे. हदगाव तालुक्यात बे-फाम अवैध दारुची तस्करी जुगार रेती माती मुरुम उत्खननात ब-याच जणांचा सहभाग दिसुन येतो. या मधुन बराच पैसा मिळत आसल्याने गावगुंडाचे मनोधैर्य वाढले आहे. त्यांना 'खाकी जरब' ची जराशी ही भीती दिसुन येत नाही. यामध्ये येणा-या विविध निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर काही चोरट्या वाळु माफीया विविध राजकीय स्थानिक राज्यकर्त्याचे समर्थक असल्याचा आव सोशल मिडीयावर आणत आहे ही वस्तुस्थिती आहे.

गंभीर गुन्ह्याचे डिटेक्शन कमी झाले 

मागील दोन वर्षाचे अवलोकन केल्यास दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्रक्रणामध्ये बहुतांशी प्रक्रणात पोलिसांनी आपल्या सोयीनुसार तपास केल्याचे जाणवते दोषसिद्ध्दीचे प्रमाण अतिशय खालवले असण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी पोलीस आपल्या सोयी नुसार काम करतांना दिसुन येतात. वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी कधी तरी हदगाव पोलिस स्टेशनला भेट देतात. काय शेरा लिहतात ही बाब गोपनिय असली तरी वरिष्ठ पोलिस अधिकारी व इथल्या जनतेशी ते कायदा व सुव्यवस्था विषयी चर्चा ही करित नाहीत.

सण उत्सव इदच्या पार्श्वभूमीवर शांताता बैठकीच नियोजन करण्यात येत. त्या बैठकीत फारशी अशी चर्चा होतांना दिसुन येत नाही. आता तर शांताता बैठकीला स्थानिक पञकरांना बोलविण्याच टाळत असल्याच दिसुन येत आहे. दैनिकाच्या स्थानिक पञकाराना तर इथल्या पोलिस स्टेशनला वावड असल्यासारख पोलिस वागत असतांना दिसुन येतात. हदगाव पोलिस स्टेशन त्यांच्या वर्षभरातील कामकाजचा आढवा घेतला तर विशेष अशी कोणतेही ठोस कामगिरी झाल्याचे दिसुन येत नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी