पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मंगेश कदम यांची मागणी
नांदेड| जिल्हातील रमाई आवास घरकुल योजनेचे अनुदान अडीच लाखा ऐवजी पाच लाख रुपये करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम व अँड.धम्मपाल कदम यांनी तरोडा येथील आयोजित कार्यक्रमात केली.
नांदेड जिल्हयात रमाई आवास योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात असुन् त्यांना आताचे जे अडीच लाख अनुदान आहे ते वाढत्या महागाई मुळे अपुरे पडत आहे. या योजनेच्या अनुदानाचे अंदाजपत्रक 2008 साली ठरवण्यात आले होते.
2008 च्या डी एस आर नुसार सध्याच्या वाढत्या महागाईमुळे घरकुलाची काम होऊ शकत नाही बाजारात वाढलेले घरकुलाच्या बांधकामाच्या साहित्याचे दर म्हणजेच लोखंड, रेती, सिमेट, खडी,स्टील दरवाजे, फरशी आणि त्याचे भाव हे आकाशाला भिडलेले आहेत महागाई निदेशांकाचा विचार करता 2008 च्या घरकुलाच्या रकमेमध्ये घरकुलाचे पूर्णत्वास काम जाऊ शकत नाही करिता या अनुदानाची रक्कम अडीच लाखाहून पाच लाख करण्यात यावी.
त्यामुळे गोगरीब मागासवर्गीय, लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण व दर्जेदार होईल. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासन स्तरावर ही बाब निर्दर्शनास आणून या लाभार्थ्यांचे अनुदान अडीच लाखाहून पाच लाख करावे.अशी मागणी नांदेड महानगर पालिकेचे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम व काँग्रेस शहर कमिटीचे महासचिव अँड.धम्मपाल कदम यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
घरकुल योजनेचे अनुदान वाढविण्या संदर्भात प्रयत्न करु- पालकमंत्री अशोकराव चव्हाण
तरोडा बू येथील विविध विकास कामाच्या आयोजित कार्यक्रमात त्या भागाचे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम यांनी रमाई घरकुल योजनेचे अनुदान अडीच लाखा ऐवजी पाच लाख रुपये करण्याची मागणी केली असता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकामंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मागणीचा विचार करून निश्चित शासन स्तरावर अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.