पूर्णा-अकोला विशेष गाडी नियमित एक्स्प्रेस बनून नवीन क्रमांकाने धावणार -NNL


नांदेड|
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार गाडी संख्या 07573/07574 अकोला-पूर्णा-अकोला हि विशेष गाडी दिनांक 1 एप्रिल, 2022 पासून नियमित एक्स्प्रेस  बनून नवीन क्रमांकाने धावणार आहे. 

दिनांक 1 एप्रिल, 2022 पासून गाडी संख्या 07573 हि विशेष गाडी नियमित एक्स्प्रेस बनून अकोला ते पूर्णा दरम्यान 17683 या नवीन क्रमांकाने धावेल. तसेच दिनांक 1 एप्रिल, 2022 पासून गाडी संख्या 07574 हि विशेष गाडी नियमित एक्स्प्रेस बनून पूर्णा ते अकोला दरम्यान  17684  या नवीन क्रमांकाने धावेल. प्रवाशांनी कृपया लक्षात घ्यावे कि कोविड-19 पूर्वी हि गाडी अकोला-पूर्णा-अकोला दरम्यान गाडी संख्या 57583 / 57584 या क्रमांकाने धावत होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी