या अपघातामध्ये वानर मरणाच्या अवस्थेत जखमी होऊन पडले होते. हि खबर नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांना समजताच त्यांनी लगेच घटना स्थळी धाव घेऊन त्या वानराला पशुरुग्णालयात दाखल करून त्यावर उपचार करून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला इंजेक्शन दिले. शिवानंद पांचाळ यांनी माणुसकीच्या नात्याने अशा जखमी अवस्थेतील वानराला सोडून देणे चुकीचे आहे.
असा विचार करून त्यांनी वानराला तीन दिवस आपल्या घरी ठेऊन .त्याचे पालन पोषण करून वानराची प्रकृती ठणठणीत झाली असता .त्याला शेतात नेऊन सोडुन दिले . समाजात माणुसकी आजुन जिवंत आहे. प्राण्यांना बोलता येत नाही.त्यांना दु:ख व्यक्त करता येत नाही. पण देवाने माणसाला तर बुद्धी दिली आहे . इथे माणुसकी नाही दाखवणार तर कुठे दाखवणार शिवानंद पांचाळ यांनी असे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.