विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची सोय करा - एसएफआयचा आंदोलनाचा इशारा -NNL


नांदेड।
स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठातील सर्व संकुलनामध्ये व लायब्ररीमध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याची व शौचालयात सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी दि २९ मार्च रोजी  एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने कुलगुरू डाॅ. उद्धव भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा एसएफआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

  विद्यापीठातील सर्व संकुलातील अभ्यासक्रमाचे दि १५ मार्च पासून सकाळच्या सत्रात ऑफलाईन लेक्चर सुरू झाले.त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. तर दुपारच्या वेळी लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करीत आहेत.मात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने दुपाराच्या वेळी कडक उन्हात रिकाम्या पाण्याच्या बाॅटल्या घेऊन विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. 

  त्याच बरोबर अनेक संकुलातील शौचालयालयात व लायब्ररी मधील शौचालयात मागील चार दिवसा पासून सांडपाण्याचा तुटवडा पडल्याने विद्यार्थ्यांन नाहक त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठातील सर्व संकुलात व लायब्ररीमध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची सोय करावी अशी मागणी एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्य्या वतिने करण्यात आली.या निवेदनावर एसएफआयचे काॅम्रेड पवन जगडमवार , वाघमारे सिद्धार्थ , विजय हानवते , अंकाक्षा पिंगळे , कांबळे योगिता , देशमुख पुजा , दिव्या तौर ,  मदन इंगळे , पायल राठोड यांच्या सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी