शाळापूर्व तयारी प्रशिक्षण ....
अर्धापुर, निळकंठ मदने| महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि प्रथम शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाळापूर्व तयारी मेळावा अर्धापूर कन्या केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते पाचवी वर्गाचे शिक्षक, मुख्याध्यापक ,अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यासाठी अर्धापूर येथील जि. प. प्रा. शाळा नवी आबादी उर्दू शाळा येथे केले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
प्रशिक्षणाला सुलभक म्हणून उषा नळगिरे व मुकूंद जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुपार सत्रात डाएट प्राचार्य डॉ रविंद्र अंबेकर, अधिव्याख्याता डाॅ माणिक जाधव, डाॅ धुमाळे यांनी भेट दिली असता माणिक जाधव यांनी प्रशिक्षणार्थांना ६० दिवसाच्या कृतीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. डाॅ धुमाळे यांनी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्याची गरज काय आहे. शिक्षकांची भूमिका काय असेल हे आपल्या मार्गदर्शनातून समजावले. प्राचार्य डॉ .रविंद्र अंबेकर यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्यात पालक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षणप्रेमी यांनी कसे कृतीयुक्त सहभागी करून घेता येईल, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सहभाग किती महत्वाचा आहे. हे पालकांना समजावून मुलांच्या शिक्षणात पालकांचा कृतीयुक्त सहभाग घेवून गुणवत्ता वाढीसाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे असे म्हटले आहे .
शाळापूर्व पूर्व तयारी मेळावा प्रत्येक शाळेतून उत्साहाने साजरा झाला पाहिजे कारण पहिलीत प्रवेशपात्र मुलांच्या शिक्षणासाठी आपणास एक नवीन दिशा मिळेल असे मत व्यक्त केले. शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम प्रभावीपणे राबवू असे प्रतिपादन विकास चव्हाण यांनी केले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे असे उषा चव्हाण नळगिरे यांनी आपल्या सुलभनातून सांगितले. प्रत्यक्ष मेळावा कसा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन मुकूंद जोशी यांनी केले व दोन गट करून मेळावा भरवण्यात आला. त्यानंतर दोन गटातील सादरीकरण घेतले आणि वंदे मातरम् या गीतगायनाने प्रशिक्षणाची सांगता केली. प्रशिक्षणासाठी इमारत, आवश्यक साहित्य, अल्पोपहाराची व्यवस्था मुख्याध्यापक ताहेर सर त्यांच्या टिमने केली. तंत्रसहाय्य संतोष राऊत यांनी केले.