‘महाराष्ट्र सायबर’ आणि ‘मेटा’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम -NNL

विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची माहिती


मुंबई|
महाराष्ट्र सायबर विभाग आणि  मेटा प्लॅटफॉर्म यांच्यावतीने उद्या सोमवार दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई  येथे  डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डिजिटल सुरक्षितता आणि किशोरवयीन मुले, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सायबर संबंधी सुरक्षेसाठी जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डिजिटल साक्षरता जागरुकतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, हिंदी टेलिव्हिजन आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी  याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून त्यांचा अनुभव कथन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.

सायबर बुलींग, सेक्सटोर्शन, डार्कनेट सर्व्हिसेस, सोशल इंजिनिअरिंग, ट्रोलिंग, आयडेंटिटी थेफ्ट याविषयी जागरूकता पसरवणे, ऑनलाइन धोक्यांचा सामना करण्यासाठी  आवश्यक साधने आणि माहिती देणे,  सुसज्ज करणे, सुरक्षित ऑनलाइन वर्तनाला प्रोत्साहन देणे अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी