येथील सेवा समर्पण परिवार स्वंयसेवी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दि. २७ रोजी तहसील कार्यालय येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी डॉ. इटनकर बोलत होते. माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, राजेश्वर रेड्डी लोकावाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिशन आपुलकीच्या यशस्वितेसाठी गावातील समृद्ध झालेल्या व्यक्तींनी अंगणवाडी, शाळा आणि गावा करीता वस्तुस्वरुपात योगदान द्यावे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर एक हजारा मागे आठशे ऐवढा आहे. तो बरोबरीला आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात प्रत्येक घराला मुलीचे नाव देवून मुलीचं नाव घराची शान हा उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 350 रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला आहे. सभापती बाळासाहेब रावणगावकर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गिते, तालुका सेना प्रमुख अमोल पवार, ..... यासह महिलांनीही रक्तदान केले. जीवन आधार ब्लड बँक, जिजाई ब्लड सेंटर यांनी रक्त संकलन केले आहे.