महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी 'हवा गुणवत्ता सुधार कार्यशाळे'चे आयोजन -NNL

यूएसएआयडीच्‍या पाठबळासह आयएससी आणि उल्हासनगर महानगरपालिकेचा उपक्रम 


ठाणे|
झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि वाहन वाहतूकीच्या लक्षणीय वाढीमुळे महाराष्ट्रातील हवेचा दर्जा खालावत जात असल्‍याचे पाहता इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीजने (आयएससी) युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी)च्या पाठबळासह उल्हासनगर महानगरपालिकेसोबत सहयोगाने उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १४ येथे प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. क्षेत्रातील विषयाशी संबंधित तज्ञांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आणि सरकारी शाळांमधील शिक्षकांना मास्टर ट्रेनर्स म्हणून सुसज्ज करण्यासाठी विशेषत: ही कार्यशाळा डिझाइन करण्यात आली होती, ज्यामुळे ते भविष्यात त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वायू प्रदूषण जागरूकता सत्रे व त्याचे प्रमाण कमी करणारे उपक्रम राबवू शकतील.

मुलांचे वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करणे आणि त्यांना त्यांचा सामना करण्यासाठी ज्ञानासह सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे. या उपक्रमाने व्यक्तींना त्यांच्या कृतींमुळे वायू प्रदूषण कशाप्रकारे कमी होऊ शकते, कशाप्रकारे हवेचा दर्जा सुधारून व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते याबाबत जागरूक करण्यासाठी उपयोजन-आधारित ज्ञान व कौशल्ये देण्यावर लक्ष केंद्रित केले. यूएमसी शाळांमधील ५० हून अधिक शिक्षकांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.

दर्जात्मक परिणाम कमी करण्यामधील त्यांच्या सहभागाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ऑन-ग्राऊण्ड वायू प्रदूषण जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षकांच्या मनामध्ये वायू प्रदूषणाबाबत जबाबदारीची भावना जागृत केली आणि त्यांना विद्यार्थी व त्यांची कुटुंबं सामाजिक व नागरी स्तरावर कशाप्रकारे शहरातील हवेचा दर्जा सुधारण्याप्रती योगदान देऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये वायू प्रदूषणासंबंधित विषय, प्रकरण, संयोजन आणि स्थितीच्या गांभीर्यतेबाबत विविध मुलभूत माहिती देण्यात आली. शिक्षकांना विद्यार्थी प्रकल्पांसाठी विविध नवोन्मेष्कारी सोल्यूशन्सची माहिती देण्यात आली, जसे इन-हाउस कंपोस्टिंग, त्यांच्या सभोवतालच्या हवेच्या दर्जाचे मॅपिंग करणे आणि वाहन नसलेल्या वाहतुकीस प्रोत्साहन देणे. उल्हासनगरमधील प्रत्‍येक शाळेला 'ए सस्टेनेबल स्कूल कॅम्पस्’ बनवण्याचा दृष्टीकोन असलेल्‍या मिशनचा उल्लेख करण्यात आला आणि शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आवश्यक माहिती व सोल्यूशन्स देण्यात आले.

या कार्यशाळेचा व्यापक प्रमाणात माहितीचा प्रसार करणा-या दृष्टीकोनाचा अवलंब करण्याच्या माध्यमातून बहुविध प्रभाव निर्माण करण्याचा मनसुबा होता आणि या कार्यशाळेला शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी व प्रशिक्षणार्थींनी कचरा विलगीकरण व प्रदूषण नियंत्रण या विषयासोबत प्रत्यक्ष कचराविषयक समस्येचे निराकरण करणा-या उपाय-केंद्रित दृष्टीकोनाबाबत चर्चा केली आणि अशा जागरूकता उपक्रमासाठी गरज व्यक्त केली. ज्यामधून या उपक्रमाचा उद्देश यशस्वीरित्या सार्थ ठरला.

उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या भाषणासह कार्यशाळेची सांगता झाली; त्यांनी सहभागी शिक्षकांना कार्यशाळेमध्ये मिळालेआल्या माहितीचा प्रत्यक्षात अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आणि सर्वांना कार्यशाळेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून सामुदायिक व नागरी-पातळीवर शहरातील हवेचा दर्जा सुधारण्याप्रती योगदान देण्याचे आवाहन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी