हेल्मेट परिधान करणे बाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जनजागृती -NNL


नांदेड|
नांदेड परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेट वापरा करण्या बाबत जनजागृती करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर प्रादेशिक परिवहन अधिकारी कामत व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आय टी आय चौक येथे व विविध ठिकाणी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारास गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले व जनजागृती केली.   

नांदेड जिल्हयातील सर्व जनतेस कळविण्यात येते की, मा. परिवहन आयुक्त यांचे दि.२२ मार्च २२ रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्हयात प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी दूचाकी चालवितांना हेल्मेट परिधान करणेबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमासाठी अंमलबजावणी सुरु केली. दि. ३० मार्च २२ रोजीच्या परिपत्रकानुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना हेल्मेट परिधान करण्याचे आदेश दिले असून, त्याबाबत विविध कार्यालयामध्ये जाऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रापका, नांदेड यांचे अधिकारी यांनी संवाद साधून त्यांना हेल्मेट वापराचे महत्व पटवून दिले आहे. 

तसेच शहरातील एसजीजीएस कॉलेज व आय.टी.आयच्या विद्यार्थाशी संवाद साधून हेल्मेट वापराचे प्रत्यक्षीक दाखविले व हेल्मेट वापराचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना हेल्मेटशिवाय कार्यालयात प्रवेश न देण्याबाबत (No Helmet No Entry) चे बॅनर व माहितीपत्रक लावण्यात आले आहे. तसेच शहरातील आयटीआय चौक, एस.पी. ऑफीस, वर्कशॉप व ढवळे कॉर्नर अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी हेल्मेट वापराबाबतचे बॅनर्स लावण्यात आले.

दिनांक 3३०मार्च २२रोजी शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करुन आलेल्या दुचाकी स्वारांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच  हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी स्वारांना हेल्मेट परिधान करणे बाबतचे प्रबोधन व त्यांना माहितीपत्रक वाटप करण्यात आले.गुलाब पुष्प वाटप करण्यात डॉ. विपिन इटनकर, जिल्हाधिकारी व शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वतः सहभाग नोंदवून हेल्मेट परिधान करुन आलेल्या दुचाकी स्वारांचे अभिनंदन केले. 

सदर उपक्रमास या कार्यालयातील अविनाश राऊत, उपप्रादेशिक अधिकारी .संदिप निमसे, सप्रापअ, मोटार वाहन निरीक्षक  पंकज यादव, मनोज चव्हाण, रत्नकांत ढोबळे, पद्माकर भालेकर, समोवानि गवळी, राजूरकर, जयस्वाल व कर्मचारी .गाजूलवाड, कंधारकर, देवदे ,पवळे, बुरकुले उपस्थित होते.दिनांक ३१ मार्च २२ रोजी नांदेड जिल्हयातील ग्रामीण भागात प्रबोधनपर विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. दिनांक १ एप्रिल  पासून कडक हेल्मेट तपासणीची कडक मोहीम या कार्यालयाद्वारे राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी,यांनी सांगितले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी