मुख्य सचिव पदी संजय मोटे पाटील यांची बिन विरोध निवड
नांदेड| अखील भारतीय केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष मा. आमदार जगन्नाथराव शिंदे(अप्पा), महाराष्ट्र राज्य कैमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशन चे सचिव अनिल नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदेव दाइ ,कार्यकारीनी सदस्य महाराष्ट्र राज्य फार्मसी कॉन्सील, व दिपक कोठारी उपाध्यक्ष मराठवाडा विभाग, यांच्या प्रयत्नाने नांदेड जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशन च्या निवडणुका मागील ३५ वर्षात पहिल्यांदा बिन विरोध झाल्या. या मध्ये जिल्हा अध्यक्ष पदी शंतनू कोडगिरेच मुख्य सचिव पदी संजय मोटे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शहर अनिलकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष ग्रामीण विवेक देशमुख कोषाध्यक्ष कुणाल कंदकुर्ते, सहसचिव शहर नितीन गंजेवार, सहसचिव ग्रामीण सुधाकर काळे पाटील, संघटक सचिव दिपक पावडे, कार्यकारीणी शहर शमेन्द्र हुंडीवाला, राजेश बुलबुले लक्ष्मीकांत लोकमनवार, समीर तम्मेवार, रमेश पुरी, सय्यद इकबाल गिरीष देशमुख, सचिण किसवे, ग्रामीण कार्यकारीणी राजाराम गटलेवार किनवट, समर त्रिपाटी माहूर, राजेश्वर लोकावाड भोकर, रामचंद्र पाटील धर्माबाद, विजय कुंचनवार बिलोली, दिपक चालीकवार कंधार, दिनेश मोटे पाटील लोहा, श्रीधर चव्हाण नायगांव, शंकर देशमुख उमरी, बाळानंद गबाळे मुखेड, शंकर पाटील वानखेडे हिमायतनगर, विनोद बोडके देगलूर, साईनाथ टेकाळे अर्थापूर विश्वास देशमुख हदगांव, बालाजी सुर्यवंशी मुदखेड, चेतन बाहेती, अब्दुल बारी, श्रीकांत गुंजकर, राजेश कानडखेडकर, निखल मापारे, एकनाथ महाजन, बंडु कवटीकवार या सर्वांची बिन विरोध निवड झाली.
या निवडी बद्दल जिल्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी स्वागत केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अरुण बरकसे, मदन पाटील, सुमेश भसीन, किरण तोष्णीवाल, शिवाजी देशमुख, साईनाथ कोतावार, संदीप गादेवार यांनी काम पाहीले. या निवडी बद्दल माजी जिल्हाअध्यक्ष अशोक गंजेवार, सदानंद मेडेवार, गोपाल सारडा , माजी सचिव संतोष दमकोंडवार, गोविंद सोमाणी, माजी जिल्हाध्यक्ष बालाजी कोत्तावार, संजय बुलबुले, अनिल जगताप, संजय चव्हाण यांनी अभीनंदन केले आहे.