बिलोली, गोविंद मुंडकर| माझा बोळेगाव येथील रेतीघाटशी काही संबंध नाही असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. ते बिलोली येथील पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
बिलोली तालुक्यात सगरोळी आणि बोळेगाव येथील रेती घाट सुरू आहेत. गंजगाव येथून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील रेती घाट लिंबा रेड्डी यांना सुटलेला आहे. हा घाट शिवाजी पाटील नामक व्यक्ती चालवतो आहे. या व्यक्तीचे माजी गृहराज्यमंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे ते नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता शिवाजी पाटील नामक व्यक्तीस मी ओळखत नसल्याचे आणि बोळेगाव येथील रेतीघाट प्रकरणात माझा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा भास्करराव पाटील खतगावकर यांनी केला आहे. दरम्यान रवी पाटील यांच्या माध्यमातून बिलोली तालुक्यात प्रवेश केलेल्या शिवाजी पाटील यांच्या बाबत राजू पाटील शिंपालकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
माजी आमदार सुभाष साबणे यांची रेतीमुळे नाचक्की झाली होती.अशी काँग्रेसची नाचक्की होऊ नये यासाठी चारित्र आपली प्रतिमा सांभाळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा माजी खासदार श्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी स्पष्टपणे आपला खुलासा केला आहे.