डोलवी-कारावमध्ये डोलताहेत २६ हजार वृक्ष -NNL

तेर पोलिसी सेंटरच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात यशस्वी वनीकरण


पुणे|
रायगडमधील पेण तालुक्यातील डोंगरावरील खुल्या वनजमिनीचे घनदाट हिरव्या वनात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि जे एस डब्ल्यू स्टील (डोलवी) यांच्या समवेत पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतलेल्या दशलक्ष वृक्ष लागवड कार्यक्रमामुळे २६ हजार वृक्षांची वनराई तयार झाली आहे. २०१७-२०१८ मध्ये त्रिपक्षीय सहकार्य  करार अंतर्गत सुरु झालेल्या या प्रकल्पातील झाडे आता २० फूट उंच झाली आहेत. 

तेर पॉलिसी सेंटर, जेएसडब्ल्यू स्टील्स आणि वनखात्याने वृक्षारोपणासाठी डोलवी आणि करव येथील वनजमिनीची दोन ठिकाणे परस्पर सहमतीने  निवडली होती. या वनीकरणाच्या जागा  जेएसडब्लू स्टील प्लांटच्या जवळ आणि मुंबई-गोवा महामार्गाला लागून आहेत. वनीकरणाच्या दोन्ही जागा अत्यंत उंच आणि पोहचण्यास कठीण आहेत. डोलवी येथील वनीकरण जागेचे साइटचे  क्षेत्र सुमारे 28  हेक्टर आहे.टेकडीभोवती अनेक दशकांपासून वेगवेगळ्या जमाती राहत आहेत. बहुतेक डोंगराळ भागात विशेषत: पावसाळ्यात मोसमी वनस्पती असतात, परंतु उन्हाळ्यात, टेकडी पूर्णपणे नापीक असते.


या प्रदेशात दरवर्षी सुमारे २२०० मिमी २५०० मिमी पाऊस पडतो. कारण हे ठिकाण कोकणात वसलेले आहे आणि ते किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे. पावसाळ्यात तीव्र उतार आणि कोणत्याही नैसर्गिक किंवा कृत्रिम अडथळा नसल्यामुळे वाहून जाणारे पाणी समुद्राच्या पाण्यात सहज मिसळते. त्यामुळे येथे निर्माण झालेली वृक्ष लागवड नैसर्गिक अडथळे म्हणून काम करेल, जमिनीची धूप कमी करेल आणि भूजल पातळी वाढेल. पाण्याची टंचाई या पातळीवर सोडवली जाऊ शकते, या हेतूने हे वृक्षरोपण केले.

स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड - काराव ही वनीकरणाची जागा डोलवीपासून 2 किमी अंतरावर वसलेली आहे .त्यामुळे तेथील भौगोलिक हवामान समान आहे. काराव साइटचे एकूण वृक्ष लागवड क्षेत्र 11 हेक्टर आहे.दोन्ही ठिकाणे आरक्षित वनक्षेत्राला लागून आहेत. बेसलाइन आणि ग्रीड लाइन सर्वेक्षण यासारख्या वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीने डोलवी ( 22.220) आणि काराव (4335) या दोन्ही ठिकाणी एकूण 26,555 देशी झाडे लावण्यात आली आहेत. कदंब, कडुनिंब, करंज,जांभूळ, ताम्हण, वड, पिपळ, महोगणी, जंगली बदाम, सिंगापूर चेरी आणि स्पॅनिश चेरी यासह विशेषतः जंगलातील झाडे लावली आहेत. सेंद्रिय खते आणि मातीने भरलेल्या 18 18-इंच पिशवीत 12-15 फूट सरासरी उंची असलेली झाडे सुमारे 30 महिने जुनी आहेत.

पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न -  डॉ .विनिता आपटे म्हणाल्या ,'टेकडीवर उंच भागात असलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात .डोंगरावरती रोज एका गाडीने 5 वेळा पाणी नेऊन तिथे ठेवलेल्या टाक्यामध्ये पाणी साठवतात आणि ग्राव्हिटी ने  खाली आणुन पाईप द्वारे  झाडाना दिले जाते .  20 हजार झाडांना   एक वेळ  पाणी द्यायला  4 दिवस लागतात.  ! 4 दिवसानी परत पहिल्या झाडाला पाणी देण्याची पाळी येते .अशा अविरत ,भगीरथ प्रयत्नांतून येथे वनराजी फुलली आहे .हे सामुहिक प्रयत्नांचे यश आहे .

पर्यावरण संवर्धन हाच हेतू :डॉ विनिता आपटे - ग्लोबल वॉर्मिंग मुळे हवामान बदलाचे जगाला अनिष्ट परिणाम भोगावे लागत आहेत . वृक्षतोड कमी करणे आणि नवे वनीकरण उभे करणे या उपायांकडे लक्ष द्यायला हवे . तेर पॉलिसी सेंटर ने डोलवी आणि कराव या दोन्ही ठिकाणी खडतर परिश्रमातून २६ हजार झाडांची वनराई तयार केली आहे . त्यातून पडीक जमिनीमध्ये ,टेकड्यांवर वनीकरण शक्य आहे ,हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे . हे प्रकल्प पाहून आमच्याकडे वनीकरणाची अनेक व्यक्ती संपर्क साधत असून अशा मोठ्या प्रकल्पाना पाठबळ लागत असल्याने शासन आणि कार्पोरेट कंपन्यांच्या सहकार्याची गरज असते . सामूहिक प्रयत्नातून वनीकरणाचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे .      

तेर पोलिसी सेंटरविषयी - तेर पोलिसी सेंटर हि एक विना नफा या तत्वावर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात २००८ पासून कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था आहे. पर्यावरण विषयक विविध प्रकल्पांवर ही संस्था काम करते. ही संस्था  शहरी वनीकरण, पर्यावरण शिक्षण घनकचरा व्यवस्थापन आणि मूल्यांकन, पाणलोट व्यवस्थापन या आणि अशा विविध स्तरावर काम करण्यासाठी सक्रीय असते, शिवाय सर्वसामान्य लोकांना पर्यावरण आणि संबंधित बाबत जागरूक करण्यासाठी कायम पुढे असते. 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी