नविन नांदेड| फार्मसी शैक्षणिक फील्ड व्हीजिट अंतर्गत निवासी अंध-विद्यालय वसरणी, नांदेड येथे आज दिनांक २६ मार्च रोजी सहयोग सेवाभावी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी व इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फील्ड व्हिजिट अंतर्गत उपक्रमात सहभागी होऊन निवासी अंध विद्यालयास भेट दिली त्यात विविध उपक्रम राबवण्यात आले, व संस्थेच्या वतीने निवासी अंध विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
त्याबद्दल शासन मान्य निवासी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.इबितवार सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव माननीय डॉ. संतुकरावजी हंबर्डे , व संस्थेचे प्राचार्य भरकड यांचे विशेष आभार मानले. निवासी अंध विद्यालयास भेट देण्याची परवानगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने विभाग प्रमुख प्राध्यापक शिंदे यांनी मुख्याध्यापक डॉ. ईबितवार यांच्ये आभार व्यक्त केले, हा उपक्रम सुरळीत पार पडावा ह्यासाठी प्रा. सावळे सर प्रा.येवले व इतर शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले.