ग्राम आणि युवकांना जोडणारा दुवा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना - प्राचार्य डॉ.उस्मान गणी -NNL


नांदेड|
ग्राम आणि युवक यांना जोडणारा दुवा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना ग्रामीण जीवनशैलीची जाणीव होऊन त्या ठिकाणी असणाऱ्या विविध पैलूंची ओळख होण्यास मदत होते. असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.उस्मान गणि यांनी केले, ते राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. 

कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष युवक शिबिर मौजे मुजामपेठ जुना येथे मागील सात दिवसापासून सुरू होते. शिबिर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.उस्मान गणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मो.दानिश, प्रा. हिना प्रा.तेहरीण हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा बाबासाहेब भुक्‍तरे यांनी मागील सात दिवसात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. 

यामध्ये वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्ररोग तपासणी, मोफत रक्तगट तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलन, कोविड लसीकरण जनजागृती, विविध तज्ञ मार्गदर्शकांद्वारे बौद्धिक उद्बोधन यासारख्या अनेक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. पुढे प्राचार्य डॉ.उस्मान गणी म्हणाले की शहरी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैलीची ओळख होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक प्रभावी माध्यम आहे.

या माध्यमातून शहरी भागातील युवकांना ग्रामीण भागाशी जोडण्यास मदत होत असते. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या बौद्धिक उद्बोधन वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडण्यास देखील मदत होत असते. विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृती आणि श्रमआदर रुजण्यास ही राष्ट्रीय सेवा योजना मोलाचा हातभार लावते. असे ही प्राचार्य डॉ. उस्मान गणी म्हणाले. या सात दिवसीय शिबिरात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून कुरेशी मोहम्मद दाईम याची निवड करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेख नजीर यांनी केले तर आभार प्रा. समिना खान यांनी मानले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे ,सरपंच गंगाधर पाटील शिंदे (पिंटू पाटील), ज्ञानेश्वर भालके,शेख मुख्तारभाई,संग्राम  निलपत्रवार,राजु बोटलावार, मुजम्मिल,शेख रफी, रमेश वाघमारे,शिवाजी बुचडे, ग्रामपंचायत सदस्य शेख फारुख आणि अब्दुल गफूर यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थ-राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांच्यामध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण झाले. या शिबिरात प्रा.निजाम सर, प्रा.सलमान सर, प्रा.अब्दुल आहद खुरेशी सर,प्रा.नदिम सर,प्रा.पुष्पा क्षिरसागर,प्रा. भांडवलकर, मोहम्मद फराज,अक्षय हसेवाड, गौस खान यांनीही सहभाग नोंदवला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी