लोहा| लोह्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध ह्रदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. राहुल घंटे यांच्या पुढाकाराने शेवडी (बा.) येथे मोफत रोगनिदान उपचार व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 300 रुग्णांची तपासणी व त्यांना मोफत औषधी देण्यात आल्या.
शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते या रोगनिदान शिबिराचे उद्घाटन शेवडी (बा.) येथे रविवार (दि.27) रोजी करण्यात आले. सरपंच बसवेश्र्वर धोंडे, माजी सरपंच कैलास धोंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जीवनज्योत क्लिनीक नांदेडच्यावतीने आयोजित या रोगनिदान उपचार शिबिरासाठी संयोजक, लोह्याचे भूमिपुत्र डॉ. राहुल घंटे, डॉ. मनोज घंटे, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. संदीप गोरे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उदय नाईक, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पुरूषोत्तम, बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन अन्नेवार, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रिया मारकवाड, डॉ. शैलजा राहुल घंटे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सविता घंटे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविकात डॉ. राहुल घंटे यांनी रोगनिदान उपचाराची भूमिका सांगितली. यावेळी जीवनराव घंटे, रुपेश घंटे तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक, जीवनज्योत मधील आरोग्य कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागात रोगनिदान उपचार शिबिरामुळे गरजवंत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.