अर्धापूर| राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक संस्कार करणारी योजना आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करते. विद्यार्थ्यांच्या मध्ये अभ्यासा बरोबरच देशसेवा, देशनिष्ठा, व कार्य कर्तव्य त्याचबरोबर सामाजिक विकासाठी समाज सेवा करण्याचे घडवून आणण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते. असे उदगार मुख्याधिकारी नगरपंचायत ,अर्धापूर शैलेश फडसे यांनी व्यक्त केले.
ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. मंचावर याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जे. सी.पठाण बेलसर येथील सरपंच रमेश पाटील क्षिरसागर हे होते. कार्यक्रमअधिकारी डॉ. रघुनाथ शेटे ,डॉ. कविता केंद्रे यांची उपस्थिती होती. बेलसर ता.अर्धापूर याठिकाणी शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक 20 मार्च ते 26 मार्च या कालावधीमध्ये बेलसर या दत्तक गावात संपन्न झाले. शिबिराचा समारोप प्रसंगी शैलेश फडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या शिबिराच्या काळात , ग्राम स्वच्छता ,बेलसर गावची स्मशान भूमी परिसर स्वच्छता, शाळेच्या परिसरामध्ये पन्नास वृक्षांचे रोपण, तसेच नदी स्वच्छता परिसर स्वच्छता, योगा व्यायाम, प्लास्टिक मुक्त परिसर, डिजिटल साक्षरता, प्रौढ साक्षरता, ऊर्जा संवर्धन व वीज बचत आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन , रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या सर्व उपक्रमांचे कौतुक शैलेश फडसे यांनी केले. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक पर अहवाल प्रा. रघुनाथ शेटे कार्यक्रम अधिकारी यांनी वाचन केले. या कार्यक्रमाचे संचालन अमोल या विद्यार्थ्याने केले तर आभार कुमारी लगळुदकर या विद्यार्थिनीने मानले. शिबिराची सांगता रक्तदान शिबिराने करण्यात आली यात शिबिरार्थी व गावातील तरुण यांनी 29 जणांनी रक्तदान दिले.