नायगाव, दिगंबर मुदखेडे| वन विभागाचा तिन तालुक्याचा कारभार पाहणारे वनपरिक्षेत्र अधिकारी तब्बल एक एक महिना कार्यालयाकडे फिरकत नसल्याने कामाचे तिन तेरा वाजतच असून, कार्यालयात आलेल्या तक्रारीचाही निपटारा होत नाही. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना तक्रादरांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने ते कर्मचारीही वैतागले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांच्या जाणीवपूर्वक होणाऱ्या दुर्लक्षामुळे तीनही तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. वनसंपदेच काहीही होवो पण घरी बसून पगारीबरोबरच लाकूड चोराकडून मोठ्या प्रमाणात अर्थिक रसद मिळत असल्याने त्यांचे इकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
नायगाव तालुक्यातील विविध आरा मशीन कारखानदार यांना मोठ्या प्रमाणात लाकूड पुरवण्यात येते. ते पण भरदिवसा वन अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहेत. याची माहिती जाणून घेतली असता अधिकारी केवळ मलिद्यात मग्न असल्यामुळे आरामशीन दार कारखानदार यांच्याकडे लाकडाचा साठा मोठ्या प्रमाणात येतो आहे. असे असताना देखील अधिकाऱ्याचे मात्र वेळोवेळी तक्रार देऊन दुर्लक्ष केले जात असल्याचे तक्राराकडून सांगितले जात आहे. लाकूड चोरावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे सामान्य जनतेतून अधिकाऱ्याच्या खाबुगिरी वृत्तीबाबत तीव्र सांगतो व्यक्त होतो आहे.
नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाकूडतोड्या होत असल्यामुळे हिरवीगार असलेली वनसंपदा वाळवंट झाल्याचे दिसू लागले आहे. यात वन अधिकारी कर्मचारी वनपाल म्हणून बघत असल्यामुळे कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. तक्रार पत्र टेबलवरच कुठलीच कारवाई नाही असा नियम त्यांनी लागू केला आहे. पत्र येतात बघतात टेबलच्या खाली दाबल्या जातात. त्यामुळे अश्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार पणामुळे वन्यप्रेमी जनता त्रस्त झाली आहे. तक्रारदार तक्रार करून तर कुठल्याच प्रकारची चौकशी व कारवाई होत नसल्यामुळे अधिकारी सर्व मिलीभगत आहेत असे समजले जाते आहे.
चौकशीच्या नावाखाली परस्पर भेट गाठी होतात असा प्रश्न जनतेतून बोलल्या जात असून, चौकशी कारवाई मात्र शून्य आहे. अधिकाऱ्याची हि वृत्ती भविष्यकाळात वनसंपदेच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करणारी ठरते आहे. अधिकारी टाकणारी आल्या तर कार्यवाही..? करत नाहीत आणि फोन तर उचलतच नाहीत. त्यामुळे भविष्यकाळात या भागाचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.. असा सवाल जाणत विचारीत आहे. याकडे नांदेड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक लक्ष घालतील का..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.