हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सरसम येथे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर चालू आहे.यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमदानातून शिक्षण दिले जात आहे.या राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गावातील दलीत वस्तीतील साफ सफाई करून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
शिबिराच्या चौथ्या दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी गावातील दलित वस्तीत जाऊन संपूर्ण परिसर व इतर गल्लीबोळात जाऊन रस्त्यांवरच्या कचऱ्याची साफसफाई केली. तसेच नाली सफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचर्याचा ढिगारा करून पेटवून दिला. मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रमदान कसे करायचे याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले.सकाळी ७ ते १२ या वेळेत ठिक-ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी श्रमदान करून आपले कार्य व्यवस्थित पार पाडले.
दुपारच्या सत्रात डॉ संघपाल इंगळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतीक पातळीवर अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी आपल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. आणि एकंदर बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर दुसरे मान्यवर ॲड. किरण कुमार गुंडाळे यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात सखोल माहिती दिली. या सत्राचे अध्यक्ष डॉ. कृष्णानंद पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सहकार्यक्रमाधिकारी डॉ.एल. बी. डोंगरे, डॉ. सविता बोंडारे आदी उपस्थित होते.
तर संध्याकाळच्या सत्रात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गायक राजेंद्र हनवते, व कवि विजय वाठोरे, प्रा. मारोती हनवते, राज यशवंतकर, गणेश वाघंबरे आदींनी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सदरील दोन्ही सत्रांच सुंदर सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप चा प्रशिक्षणार्थी निलेश चटणे यांनी केले. या मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद डॉ. शेख शहेनाज, डॉ. शाम इंगळे, डॉ. के. बी. पाटील, डॉ. सविता बोंढारे, डॉ. संघपाल इंगळे, डॉ गजानन दगडे घेतला.
तदनंतर शिबिरार्थींनी आपापल्या कला सादर करत गितगायन, अभिनयात्मक सादरीकरण केले. या प्रसंगी डॉ. कृष्णानंद पाटील, डॉ. शिवाजी भदरगे, डॉ. एल. बी. डोंगरे, डॉ. सविता बोंढारे, डॉ. गजानन दगड यांनी गीत सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.