ग्रामस्थांनी गरीब कुटूंबियांतील मुलांना शश्त्रक्रियासाठी मदतीचा हात समोर करून माणुसकी जिवंत ठेवली
मृत्यू झालेल्या मुलाच्या माताऱ्या आईचे दुःख... साहजिक आहे ना..!
त्यांचे दोनी मुलं लहान असतांनाच आपल्या पतीचे निधन झाले व ज्या दोन मुलाकडे पाहून मी जीवन जगत होतो त्यातील एक धाटका मुलगा दगावला व एक मुलगा ज्यांची पत्नी दिवस होऊन डिलेव्हरीच्या दोन दिवसावर आली तो दवाखान्यात मृत्यूची झुंज देत आहे.
आता अपघातात गमाभीर असलेल्या त्यां मुलाची मोठी शस्त्रक्रिया करायची आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची, राहायला घरं नाही, उदरनिर्वाह करण्यासाठी जमीन नाही, एवढे पैसे आणावे तरी कुठून, काय करावं काही समजेना आपण जीव सोडला तर माझे नातवंड खूपच परके होतील, यासर्व संकटात पडून ढसा ढसा रडत होती. या सर्व गोष्टीनी भावनिक होऊन जो मुलगा नांदेड येथे उपचार घेत आहे व त्यांना शस्त्रक्रियाची गरज आहे. त्यांना सहानुभूती म्हणून ग्रामस्थांनी प्रत्येक घरून 100, 200, 500, असे त्यांचे स्वखुशीने आर्थिक मदत आहे. या मदतीने खरंच असे लक्षात येते कि आपल्या खेड्यापाड्यात आजही माणुसकी जिवंत आहे.