नांदेड| वृत्तपत्र विक्रेत्यांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे यावर्षिचं राज्यस्तरीय अधिवेशन 1 आणि 2 मे 2022 ला चंद्रपूर येथे घेण्याचे राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत ठरले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर व आयोजक चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद पन्नासे यांनी दिली.
अधिवेशनाच्या संदर्भात राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, विनोद पन्नासे,अण्णासाहेब जगताप, संजय पावसे, राजेंद्र टीकार यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस बालाजी पवार यांनी ठाणे येथे होणारे राज्यस्तरीय अधिवेशन कोरोनाच्या निर्बंधांमुळं स्थगित केले होते याची आठवण करून दिली. चंद्रपूर येथे 2 मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासाठी यजमानपद मिळावे यासाठी विनोद पन्नासे यांनी विनंती केली. त्यानुसार सर्वानुमते चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरले. यावेळी कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी अधिवेशनाची माहिती विभागीय उपाध्यक्ष व संघटन सचिव यांनी आपापल्या विभागातील जिल्हा, तालुका संघटनांना कळवावी असे सांगितले.
या अधिवेशनासाठी पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी नुकतीच चंद्रपूर येथे भेट देऊन तेथील स्थानिक वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी विभागाचे उपाध्यक्ष दिनेश ऊके, संघटन सचिव व जिल्हाध्यक्ष विनोद पन्नासे व स्थानिक संघाचे विजय रिठे,मेघराज टोनपे, मचिंद्र वाळके,चंद्रशेखर मत्ते,प्रमोद पन्नासे,संजय वददेलवार,गंगाधर बीरे,पंकज कोहळे,सूर्यभान कार्लेकर, हिमांशू पन्नासे,दिलीप होकाम प्रदयुमन तिघरे आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनील पाटणकर यांनी सांगितले की, सध्या कोरोना संसर्ग कमी होत आहे त्यामुळे सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. कारण चंद्रपूर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चांगलं अधिवेशन करण्याचा उत्साह आहे त्याला राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी साथ द्यावी. चंद्रपूर येथे होणा-या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत, त्यावरती चर्चा होऊन पुढील दिशा ठरविली जाईल.
चंद्रपूर येथे होणा-या अधिवेशनासाठी स्थानिक संघटनेच्या नित्यनियमाने बैठका सुरू आहेत. अधिवेशन बाबत जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे हे अधिवेशन आगलेचमद्रावेगळे आणि ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती विभागीय संघटन सचिव विनोद पन्नासे यांनी दिली. सदर अधिवेशनासाठी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष गणेश वडगांवकर, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सल्लागार चंद्रकांत घाटोळ, संदिप कटकमवार, व्यंकटेश आनलदास, बालाजी चंदेल,गजानन पवार, दिपक नरवाडे,राजेश पवार, सतिश कदम, बालाजी सुताडे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.