अनाथ तरुणाची जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचेकडून 2 सेकंदात दखल -NNL

मुदतीचा शेवटच्या दिवशी अहवाल पूर्ण करून युवकाला दिला न्याय .


नांदेड/मालेगाव, अनिल मादसवार|नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील राजेश अन्नपुर्वे हा तरुण लहान वयातच आईवडीलांचे छत्र हरवुन बसला. घरातील मोठा असल्याने ईतर 2 भावंडाची जबाबदारी खांद्यावर घेत, रसवंतीगृह, रात्रीला चहाचा गाडा चालवुन राजेशने पदवी शिक्षन पुर्ण केले. आई वडीलांचे छत्र हरवले तरी जीवनात काही करन्याची जिद्द त्याच्या मनात ठाम होती. 

दि.३ एप्रिलला होणार्‍या mpsc परीक्षेसाठी अनाथ प्रवर्गातून राजेशने अर्ज दाखल केला ३० मार्च पर्यंत अनाथ दाखल्यासाठी ग्रामसेवकाचा अहवाल बाल कल्यान समीतीने मागवला. परंतु १० ते १५ दिवस ग्रामसेवक संजय निलमवार यांनी अहवाल दिला नाही. अखेर सामाजिक कार्यकर्ते सुभाशिष कामेवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांना वाट्सअप संदेश पाठवला. 


अहवाल देन्याची शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी २ सेकंदात उत्तर देऊन संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अहवाल पूर्ण करून देण्याचे आदेश दिले. एकीकडे ग्रामसेवकाचा कामचुकारपना तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचा संवेदनशीलतेमुळे तरुणाचे शैक्षणिक जिवन उध्वस्त होता होता वचले. प्रशासनाला दिरंगाई पणा आपण नेहमीच ऐकतो परंतू जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यास मात्र अपवाद ठरलेत. 


मागील 15 दिवसापासुन मी ग्रामसेवक संजय निलमवार यांना संपर्क करत होतो परंतु ते कार्यालयात येत नव्हते अखेर 29 तारखेला त्यांना विनंती केली असता त्यांनी अहवाल दिला नाही. म्हणुन मी सामाजीक कार्यकर्ते सुभाशिष कामेवार यांच्या कडे गेलो. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर साहेबांना संपर्क करून जिल्हाधिकारी साहेबानी तात्काळ आदेश दिल्या मुळे माजे शैक्षणिक नुकसान टळले. अशी प्रतिकारीया राजेश अन्नपुर्वे (अनाथ विद्यार्थी) यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

१५ दिवसापासुन ग्रामसेवक संजय निलमवार हे जाणीवपुर्वक अहवाल देन्यास टाळाटाळ करत होते. अखेर शेवटाचा दिवशी राजेश माझ्याकडे आल्यामुळे जिल्हाधिकारी साहेबाना मी वाट्सअप संदेश केला अवघ्या 2 सेकंदात जिल्हाधिकारी साहेबानी दखल घेत संबंधित ग्रामसेवकाला आदेश दिले. जिल्हाधिकारी साहेबांचा संवेदनशीलतेमुळे तरुनाचे शैक्षणिक जिवन उध्वस्त होता होता राहिले. अशी प्रतिक्रिया सुभाशिष कामेवार (सामाजिक कार्यकर्ते) यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी