अमेरिकन डॉलरची बनावट नोट दाखवून फसविणाऱ्या तिघांना स्थागुशाने केली अटक; दोघे फरार -NNL



नांदेड| अमेरिकन डॉलरची बनावट नोट दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थागुशाच्या पथकाने गुरुद्वारा परिसरातून तिघांना अटक केली असून, वदन जण फरार झाले आहेत. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची बनावट नोट जप्त करण्यात आली आहे. या नोटेची भारतीय चलनातील किंमत साडेसातशे कोटी रुपये असल्याचे आरोपींने भासवले होते. या आरोपींकडून कार, रोख रक्कम, साहित्य असा ११ लाख ५२ हजार ३५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

नांदेड शहरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी एक पथक तयार करुन नांदेड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग आणि गस्तकामी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट नंबर एकच्या बाजूला बडपूरा येथे एर्टीगा (टीएस १७ जी २०४५) गाडीत तेलंगणा राज्यातील पाच संशयित तरुण आले असल्याचे सांगितले. आपल्याकडे “एक बिलियन डॉलर्सची नोट (भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये) असल्याचे सांगून त्यांनी हि नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करण्याचे आमिष दाखविल्याची माहिती मिळाली. यावरून स्थागुशाच्या पथकाने सापळा रचून या टोळीला जेरबंद केले. मात्र, यात दोघे जण गर्दीचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये महेश इल्लय्या वेल्लुटला वय ३० वर्ष, रा. सर्यापूर, तालुका गांधारी, जिल्हा कामारेड्डी, नंदकिशोर गालरेड्डी देवारम वय ४२ वर्ष, रा. पोचंमागल्ली इब्राहिम पेठ बांसवाडा, तालुका बांसवाडा, जिल्हा कामारेड्डी व आनंदराव आयात्रा गुंजी वय ३२ वर्ष, रा. नेकुनमबाबु जिल्हा प्रकासम, आंध्र प्रदेश – हल्ली मुक्काम गल्ली नंबर १, बांसवाडा, कामारेडी यांना अटक केली. मात्र त्यापैकी दशरथ आणि त्याचा अन्य एक साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता एक बिलियन डॉलरची बनावट नोट असून ती लोकांना खरी म्हणून द्यायची आणि ते पैसे घेऊन आले की त्यांना मारहाण करुन, चाकूचा धाक दाखवून त्यांचे पैसे घेऊन पळून जायचे असा त्यांचा डाव होता असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, एक चाकू, एर्टीगा गाडी असा ११ लाख ५२ हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध कलम ३९९ सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार हे करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी