ठाण्यात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे कामे झाली पाहिजेत - डीवायएसपी गोपाळ रांजणकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील पोलीस ठाण्यात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे कामे झाली पाहिजेत, मोठ्यांची कामे कुणीही करतो. पण गरिबांच ऐकून घेतल्यास त्याच अर्ध दुःख कमी होते. गरिबांचे कामे केल्याने जे समाधान मिळते आणि त्यांचे आशीर्वादच आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी सर्वानी आपल्या सेवाकाळात चांगले विचार अंगीकारून काम करावे असा संदेश भोकरचे उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील भोकरचे उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर गौतम पिंचा, पांडुरंग तुप्तेवार, गजानन तुप्तेवार, फेरोज खान पठाण, सय्यद मन्नान भाई, बाबुराव बोड्डेवार, असद मौलाना, पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री रांजणकर म्हणाले कि, दिवायएसपी पद म्हणजे पोलीस अधीक्षक आणि ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यातील दुवा आहे. मी माझ्या ३७ वर्षाच्या कार्यकाळात अनेक कठीण प्रसंगी आले, मात्र त्यातून जनतेचे आशीर्वाद, आमचे पोलीस विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने माझी कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण झाली. नौकरी लागणे आणि निवृत्त होणे हा दोन्ही आनंद माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' याचा अर्थ चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे असा आहे. या पोलीस खात्यात काम करताना या ब्रीदवाक्याचा सकारात्मक उपयोग आपल्या कृतीतून दाखवून द्यावा असा संदेश त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्तीबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त करून पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बहार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी केले.