प्रवीण पाटील यांचे डावपेच यशस्वी
लोहा| नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी ठरल्या प्रमाणे पदाचा राजीनामा दिला नाही. त्यांना जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी संधी दिली. पण प्रत्येक वेळी त्यांनी दिलेला शब्द खोटा ठरविला. अखेर उपनगराध्यक्ष याना पदावरून हटविण्यासाठी अविश्वास ठराव घ्यावा लागला. नगराध्यक्ष व पीठासीन अधिकारी गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी अकरा वाजता नगर पालिकेत बैठक झाली. यात बारा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले व बहुमताने ठराव पारित झाला. बेईमानी करणाऱ्यांची गय नाही असा संदेश प्रवीण पाटील यांनी या माध्यमातून दिला.
लोहा नगर पालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे.१७सदस्यांच्या सभागृहात नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, व १३- भाजपा, ४-काँग्रेस असे पक्षीय बलाबल आहे. प्रतापराव यांनी सव्वा -सव्वा वर्ष उपनगराध्यक्ष करण्याचे ठरविले. राजकीय मोठे प्रस्थ मुकदम यांच्या नंतर मागील जुलै महिन्यात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिल्या नंतरही शरद पाटील यांना उपनगराध्यक्ष केले .मुदत संपल्या नंतरही त्यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. त्यांना खूप संधी दिली पण प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली शिवाय काँग्रेसचे नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे या महिन्याच्या सुरुवातीला गेले त्याचा वेगळा संदेश गेला.
प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी तसेच माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गट नेते करीम शेख, नगरसेवक दता वाले, नगरसेवक भास्कर पाटील यांच्याशी विचारविनिमय केला व अविश्वास दाखल करण्याचे ठरले. दरम्यान फोडाफोडी करण्याचा प्रयत्न झाला.पण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवीत अविश्वास ठराव पारित केला.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिलेला शब्द पाळला.युवा कार्यकर्ते सचिन मुकदम , प्रवीण धुतमल, सूर्यकांत गायकवाड, अनिल धुतमल, नामदेव चव्हाण व सहकाऱ्यांनी आठ दिवस प्रचंड मेहनत घेतली.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव पारित झाला यावेळी बारा मते ठरावाच्या बाजूने तर विरोधात शून्य मत पडले. भाजपा गटनेता करीम शेख यांनी भाजपाच्या नगरसेवकांना व्हीप बजवला होता. स्वतः शरद पवार, व नगरसेवक बालाजी शेळके गैरहजर राहिले.तर काँग्रेसचे चारही नगरसेवक सभागृहात आले नाहीत. अविश्वास ठराव पारित झाल्या नंतर गेल्या काही दिवसा पासून शहरात असलेला समंजसपणा दूर झाला.
चिखलीकर यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले ही सगळी प्रक्रिया युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे राजकीय चातुर्य व डावपेच यशस्वी झाले .भाजपा तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्या नंतर दुसऱ्याच दिवशी उपनगराध्यक्ष पदावर अविश्वास ठराव पारित झाला .शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन चिखलीकरांच्या विरुद्ध गरळ ओकली. येत्या काळात पक्षादेश धुडकवल्या प्रकरणी नगरसेवकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात आहे .बेईमानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा संदेश या निमित्ताने देण्यात प्रवीण पाटील यशस्वी झाले.