नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका येथील आरोग्य विभागातील कार्यालयीन अधिक्षक घनश्याम परडे हे दिनांक 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
घनश्याम परडे यांनी 1988 आली मनपा सेवेत कार्यभार स्वीकारला. त्यांनी महानगरपालिकेत आस्थापना,कर विभाग, बांधकाम विभाग, स्टेडियम विभाग , पाणीपुरवठा विभाग, तसेच क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 येथे कार्यालय अधीक्षक या पदावर काम केले असून अतिशय प्रामाणिक व सेवा हेच जीवन म्हणून कर्तव्य बजावणारे अधिकारी अशी परडे यांची ओळख आहे.
दरम्यान कार्यालयीन अधीक्षक या पदावर काम करत असताना कोविड-19 याअंतर्गत महाभयानक कोरोना काळात परडे यांनी काम केले आहे. या काळात सचखंड गुरुद्वारा येथे आलेल्या शिख यात्रेकरूंना त्यांच्या गावी सुखरूप पाठवण्यासाठी महानगरपालिकेने केलेले वाहन व्यवस्थेत त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यानंतर नियत वयोमानानुसार निवृत्तीसाठी अवघे अडीच ते तीन महिने सेवा असताना महानगरपालिकेने त्यांची पदस्थापना आरोग्य विभागात कार्यालयीन अधीक्षक या पदावर केली आहे. सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणारा व गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारा अधिकारी म्हणूनही घनश्याम परडे यांची सर्वत्र ओळख आहे.