नविन नांदेड| वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण महानगरचे अध्यक्ष तथा जयराम फर्निचर वर्क्सचे मालक सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे विठ्ठलजी गायकवाड यांच्या वतीने सोनबा येलवे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कडक उन्हाळ्यात वाटसरू साठी पाणपोई मान्यवरांच्या उपस्थितीत २५ मार्च रोजी सुरु केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते मा. फारूखजी अहेमद,तर उदघाटक म्हणून सिडको ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अशोकजी घोरबांड हे होते ,प्रांरभी मान्यवरच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचे गायकवाड परिवाराकडून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक अशोकजीं घोरबांड यांनी, व फारुख अहेमद यांच्यासह,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष पी. एम. वाघमारे,श्याम कांबळे, रवी पंडीत,प्रा.विनायक गजभारे यांनी पाण्याचे महत्व काय आहे हे पटवून व गायकवाड परिवाराकडून दरवर्षी या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले व त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी या कार्यक्रमाला दैवशाला पांचाळ, बी.डी.कांबळे, सुरेश गजभारे, महेंद्र सोनकांबळे, सुभाष डोंगरे, नरसिंग दरबारे, अशोक भुरे, पैठने , सुरेश हटकर, विद्यानंद पवळे, सुदर्शन कांचनगिरे, डॉ.सिधार्थ भेदे, जयप्रकाश लांडगे, धम्मा येंगडे, गायकवाड,मारोती डोईबळे,शुद्धधन कापशीकर,नागोराव गायकवाड, साहेबराव भंडारे,पी.डी. झडते,सुमेध गायकवाड, रमेश गायकवाड, सुनील गोधणे,चंद्रकांत पांचाळ, जयकुमार गायकवाड, अमरदीप हरणावळे, अभिषेक पांचाळ, धमा गजभारे, मारोती गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यमाचे प्रस्ताविक आयोजक विठ्ठल गायकवाड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर गायकवाड यांनी तर आभारप्रदर्शन अमृत नरंगलकर यांनी केले.