नविन नांदेड| केद्र शासनाच्या प्रेट्रोल गॅस दर वाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथे प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक करून दरवाढीचा निषेध करत शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख नवीन नांदेड गजानन राजरवार यांच्या सहकार्यातून आंदोलन केले.
केंद्र शासनाने प्रेट्रोल व घरगुती गॅस चे दरवाढ केल्याचा निषेधार्थ शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख आंनदराव पाटील बोढारकर, नांदेड तालुका दक्षिण प्रमुख उद्धव पाटील शिंदे,शहर प्रमुख तुलजेश यादव,आयोजक नवीन नांदेड शहर प्रमुख गजानन राजुरवार,माजी शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड ,नंदू वैध , ऊप तालुका प्रमुख सुग्रीव वाघमारे, अशोक कामठेकर अशोक पाटील वांगीकर , गणेश जयस्वाल ,सुरेश लोट, सतिश खैरे दीपक देशपांडे ,सचिन खरे ,रवी पंचलिंगे ,दीपक पवार गोविंद हंबर्डे संजय साबणे , महिला आघाडीच्या निकिता शहापुरवाड,आनंदा वाघमारे ,पप्पू गायकवाड, माधव भिसे, संदीप जिल्हेवाड, बळीरामपुर शाखा प्रमुख संभाजी जाधव, विष्णु कदम,कृष्णा पांचाळ, पंडित व गजभारे, यांच्या सह पदाधिकारी व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,या नंतर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक करण्यात आला.आंदोलन पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बि.टी.केंद्रे व पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.