हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु.येथे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने सुरु असलेलता राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा समारोप दि.३० मार्च रोजी करण्यात आला. या शिबिरात शिबिरार्थींनी गावातील ठिक ठिकाणची स्वच्छता करुन शिबिरातून श्रमदान केले. आणि गावकर्यांनी आपले गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.
राष्ट्रीय सेवा योजना शिबीर समारोप निमित्ताने हुतात्मा जयवंतराव पाटील व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अधक्ष्या म्हणून हुजपाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदावर्ते या होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरसमचे ग्राम विकास अधिकारी राजकुमार भोगे, जीवन जगण्याची कला प्रशिक्षक नांदेड येथील वैशाली गुंजकर मॅडम,सरसम नगरीच्या सरपंच काशीबाई सखाराम ठाकूर या होत्या.यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला.यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शिबिरास उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपण गेल्या सहा दिवसात केलेल्या श्रमदानाबद्दल व आलेली अनुभवा बद्द्ल रेणू तिमापुरे,वैष्णवी,सना,नारायण मूदनवाड,निलेश चटने आदी विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
रासेयोचे कर्यक्रमअधिकारी प्रा.शिवाजी भदरगे व सहकार्यक्रम अधिकारी.प्रा.डोंगरे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात शिबिरार्थ्यांनी दैनंदिन कार्यक्रमात वेगवेगळ्या क्रियातून खूप काही शिकले..प्रा.ए. टी. शिंदे सर सायन्स कॉलेज नांदेड यांच्या व्याखानाने सुरुवात झालेल्या या शिबिरात अनेक दिग्गज प्राध्यापक मंडळी,वकील,डॉक्टर,प्रगतशील शेतकरी यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे असलेल्या जीवन जगण्याची कला प्रशिक्षक प्रा.वैशाली गुंजकर यावेळी बोलताना म्हणाल्या की,श्री श्री रवीशंकर यांनी १९८२ पासून जीवन जगण्याची कला याची सुरुवात केली.ज्ञान,जेवण, झोप,प्राणायाम यामुळे ऊर्जा मिळते.शिबिरार्थींनी या प्रणायमातून व जीवन जगण्याच्या कलेतून आपलं व्यक्तित्व प्रगल्भ करून घ्यावे.जिवन जगण्याच्या कलेविषयी त्यांनी अभ्यासपूर्वक व्याख्यान दिले.यावेळी त्यांनी शिबिर्थींना भ्रस्तिका प्राणायम बौद्धिक खेळ,शारीरिक खेळातून त्यांनी जीवन जगण्याचा कलेचे प्रशिक्षण दिले.सर्वांना विविध प्राणायम करून दाखवले व विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंदाना देखील प्राणायम करायला भाग पाडले आणि जीवन जगण्याची कला शिकवली.
या कार्यक्रमाचे आपल्या अष्टपैलू शैलीतून सुंदर असे सुत्रसंचलन इतिहास विभाग प्रमुख वसंत कदम सर यांनी केले.दि.२४ मार्च रोजी सुरू झालेल्या या शिबिरात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी या सहा दिवसात सरसम गावाची स्वच्छता करून गावास स्वच्छतेचे धडे दिले. या सहा दिवसीय शिबिराचे अहवाल वाचन प्रा.शिवाजी भदरगे सर यांनी केले.दि.२४ मार्च रोजी सरसम नगरीतील महामानवांचे पुतळे व परिसरातील स्वच्छता केली.दलित वस्तीची नाले सफाई व रस्ते झाड झुड करून गावकऱ्यांना स्वच्छतेचे ढडे दिले.त्यानंतर गावातील मंदिरे,बौद्ध विहार,,पशु वैद्यकीय दवाखाना येथील साफ सफाई केली.
दि.२९ रोजी करंजी येथील प्रगतशील शेतकरी संदीप चाभरेकर यांच्या शेतीत जाऊन शेत शिवार भेटीत विद्यार्थ्यांनी शेती करण्यासाठी चे नवनवीन पध्दतीने वैज्ञानिक धडे शिकले.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदावर्ते यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्वला सदावर्ते मॅडम,प्रा.वैशाली गुंजकर मॅडम,राजेंद्रभोगे ग्राम विकास अधिकारी सरसम,महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.गजानन दगडे, सखाराम ठाकूर,पत्रकार विजय वाठोरे, प्रशांत राहुलवाड,पवन बनसोडे,नामदेव मोकासवाड,कपिल कांबळे उपस्थित होते.