नायगाव, दिगंबर मुदखेड| नायगाव तालुक्यातील रहिवासी लोकनेते स्वर्गीय माजी खासदार तथा माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांची गतवर्षी महामारी कोरोनाची लागणं झाल्याने दिनांक 3 मार्च 2021 रोजी त्यांच्या आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने पूर्ण नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील पूर्ण परिसर हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या चाहत्यांना आपल्या आधारवड हरवल्याची दुःख व्यक्त करण्यात आली होती.
त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहावेत त्या निमित्ताने सर्व परिसरातील लोकनेते स्वर्गीय मा.मंत्री गंगाधर देशमुख कुंटूरकर यांच्या कारकीर्दीतील जीवन प्रवास पूर्ण स्मरणात राहण्यासाठी स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना त्यांच्या उजाळा मिळावा. यासाठी मा. राजेश देशमुख कुंटूरकर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई तथा डायरेक्टर जय अंबिका साखर कारखाना कुसुम नगर कुंटूर व रुपेश देशमुख कुंटूरकर माजी सरपंच कुंटूर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मूळगावी मौंजे कुंटूर ता. नायगाव जि. नांदेड येथे दिनांक 03 एप्रिल 2022 रोजी रविवारी सकाळी 10:00 वाजता स्वर्गीय मा.मंत्री गंगाधर देशमुख कुंटूरकर यांचे स्मारक लोकार्पण व स्मृति ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने माननीय देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रेरणा स्थळ स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त स्मारक समारंभ अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री नांदेड, खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते धुरंधर या स्मृती ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त विशेष अतिथी म्हणून मा. खा.भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री, जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रीय अध्यक्ष सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली, रणजितसिंह मोहिते पाटील आमदार विधान परिषद, सुरेश वरपुडकर माजी मंत्री, सूर्यकांता ताई पाटील माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, हेमंत पाटील खासदार हिंगोली लोकसभा मतदारसंघ, माधवराव पाटील किन्हाळकर माजी मंत्री, नीलम नाईक आमदार विधान परिषद,सुभाष वानखेडे माजी खासदार हिंगोली ,अमरनाथ राजूरकर आमदार विधान परिषद तथा गटनेते काँग्रेस,कमलकिशोर कदम माजी मंत्री, विक्रम काळे शिक्षक आमदार औरंगाबाद विभाग
बापूसाहेब देशमुख गोरठेकर माजी आमदार भोकर विधानसभा,राम पाटील रातोळीकर आमदार विधान परिषद,वसंतराव चव्हाण माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड ओमप्रकाश पोकर्णा माजी आमदार, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पवार नायगाव विधानसभा मतदारसंघ, आमदार तुषार राठोड मुखेड विधानसभा , आमदार मोहनराव हंबर्डे नांदेड दक्षिण, आमदार माधवराव पाटील जवळगावकर किनवट विधानसभा, आमदार बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, आमदार जितेश अंतापूरकर देगलूर , आमदार भीमराव केराम किनवट , आमदार शामसुंदर शिंदे कंधार विधानसभा , मंगाराणी अंबुलगेकर अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड, ओमप्रकाश पोकर्णा मा. आमदार उत्तर नांदेड, जयश्री पावडे महापौर महानगरपालिका नांदेड, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आमदार मुखेड, प्रदीप नाईक माजी आमदार किनवट, नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार हदगाव , गंगारामजी ठक्करवाड माजी आमदार बिलोली, व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. नांदेड, प्रविण साले महानगर अध्यक्ष भा.ज.पा.नांदेड यांच्यासह आणेक मान्यवरांची प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आहवान राजेश देशमुख कुंटूरकर व रुपेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडून करण्यात आली आहे.