परभणी| राष्ट्र आणि धर्मावर होणाऱ्या आघाताविषयी बोलताना श्री. घनवट म्हणाले की धर्मनिरपेक्षता म्हणजे “अल्पसंख्याकाना फायदे आणि हिंदूंना कायदे” असे झाले आहे, हिंदु आज 9 राज्यात अल्पसंख्यांक झालेले असून आज देशामध्ये अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी अल्प संख्यांक आयोग, शैक्षणिक सुविधा, संरक्षण हे सर्व दिले जाते. परंतु बहुसंख्य असणाऱ्या हिंदु समाजाला मात्र संविधानातील समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य यापासून उपेक्षितच आहे.
लव जिहाद, लँड जिहाद या सारख्या 20 हून अधिक प्रकारच्या जिहादच्या विळख्यात हिंदु समाज आडकला आहे, यातच भर म्हणून हलाल जिहाद च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात असून व्यापारी जगत आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे हे षड्यंत्र आहे. हे सर्व थांबवायचे असल्यास सर्वानी संघटित होवून प्रतिकार करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. याविषयी मार्गदर्शन श्री. सुनील घनवट यांनी येथील राजाराम सभागृहात केले.
आपल्या मार्गदर्शनात श्री. घनवट यानी म्हंटले की “सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी केली जात आहे . त्यासाठी व्यापार्यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी 21 सहस्र 500 रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या संघटनेकडून दिले जाते. या हलाल अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे 2 ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी हर हर महादेव च्या घोषणांनी पुढील कृती आणि मागण्या करण्याचे निश्चित करण्यात आले –1. कोणतेही उत्पादन बाजारात विक्री करण्यासाठी भारत सरकारने जी नियमावली सिद्ध केली आहे, ती सोडून केवळ धर्माच्या आधारावर कोणालाही स्वतंत्र प्रमाणपत्र देऊन ती वस्तू बाजारात विकण्याची अनुमती देण्यात येऊ नये.
2. ज्या ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया यांच्यासारख्या ज्या ज्या सरकारी आस्थापनांमध्ये असे प्रमाणपत्र दिलेल्या वस्तू विकल्या जातात, त्याची अनुमती त्वरित रहित करण्यात यावी.
3. आजपर्यंत ज्या इस्लामिक संस्थांनी ‘हलाल’पत्र दिले, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? यामागे कोणते आंतरराष्ट्रीय षड्यंत्र नाही ना ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित संस्था आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, अधिवक्ता आणि विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये अधिवक्ता दिलीप देशमुख,अधिवक्ता सतीश देशपांडे, श्री. शंकर आजेगावकर, श्री. शंकर देशमुख यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. टाकळकर, अधिवक्ता श्री. दराडे, अधिवक्ता श्री. गिरी, श्री. उदय जैन, अग्रवाल समाजाचे श्री. कमलकिशोर अगरवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शिंदे, गुजराती समाजाचे श्री. मितेश शहा, हनुमान युवक मंडळाचे श्री. अजय फुलारी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. शंकर आजेगावकर, प्रस्तावना श्री. वैभव आफळे यांनी केले.
कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदू जनजागृती समिती,संपर्क क्र.: 8208443401