'रोड मराठा'च्या शिष्टमंडळाने घेतली कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांची भेट ; पानिपत ला येण्याच दिल निमंत्रण -NNL


नांदेड।
तिसऱ्या पानिपत युद्धातील वीरांचे वंशज असलेल्या रोड मराठा'च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांची भेट घेतली,यावेळी त्यांचे कुलगुरूनी स्वागत केले. यावेळी विद्यापीठ माध्यम विभागाचे संचालक डॉ दिपक शिंदे,व्यवस्थापन परिषद सदस्य वसंत भोसले,नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे हे उपस्थित होते.

पानिपत च्या छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघाचे अध्यक्ष असलेले मराठा जगबिर तुरण,मराठा लखीराम धुदाने आणि बाबू राम धुदाने हे नानक साई फाऊंडेशन च्या निमंत्रण वरून नांदेड येथे आले होते. लंगर साहिब गुरुद्वारा चे मौजुदा मुखी संत बाबा नरेंद्र सिंघ जी यांच्या हस्ते त्यांचा काल सत्कार करण्यात आला. यावेळी नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, डॉ गजानन देवकर, शिवाजी वाघ, तुकाराम कोटूरवार,श्रेयस कुमार बोकारे, आयुब पठाण,जयप्रकाश नागला उपस्थित होते. दरम्यान हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्या सूचनेनुसार युवा सभेचे प्रदेश सरचिटणीस माधव पावडे यांनी पानिपत च्या रोड मराठ्यांच्या शिष्टमंडळाचा सत्कार त्यांच्या सम्पर्क कार्यालतात आयोजित केला होता. मराठा सेवा संघाच्या वतिने शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवा संघाचे अध्यक्ष कल्याणकर, इंजि शिवाजी राजे पाटील, शे रा पाटील, कुडे सर हे उपस्थित होते. 

हरियाणा च्या पानिपत भागात रोड मराठा आपले अस्तित्व टिकवून आहेत, शेती हा त्यांचा प्रमूख व्यवसाय सांभाळून असले तरी व्यापार आणि नोकरी, क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी त्यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघाच्या नेतृत्वाखाली रोड मराठा एक संघ आहे, दरवर्षी पानिपत येथे 14 जानेवारी रोजी शौर्यदिन सोहळा साजरा केला जातो, या सोहळ्यात महाराष्ट्रातील मंडळींनी सहभागी होत जावे असे आवाहन रोड मराठा शिष्टमंडळाने केले आहे. दरम्यान कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना त्यांनी पानिपत ला येण्याच निमंत्रण दिले. 

या शिष्टमंडळाने स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र विभागाला पण भेट दिली,माध्यम शास्त्र विभागाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांनी विभागात सुरू करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. विभागाचे वतीने पानिपत च्या शिष्टमंडळाचा सत्कार केला. हरियानातील रोड मराठा समाजाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक अभ्यास हा विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या श्रीकांत बापूराव बोकारे या विद्यार्थ्यांची रोड मराठा शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी